पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी प्रतिभावंतांचे कर्णाचे आकलन :- मराठी प्रतिभावंतांना कर्णाच्या व्यक्तिरेखेचे विशेष आकर्षण सतत वाटत आले आहे. आर्वाचीन मराठी साहित्याच्या कालखंडाच्या आरंभापासून अगदी आजपर्यंत है आकर्षण वाटत आलेले आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात तर ते विशेष वाढलेले आहे, असे म्हणता येईल. मराठी ललित साहित्यात कर्णविषयक साहित्यकृतींची नुसती संख्या जरी आपण लक्षात घेतली तरी या गोष्टीची जाणीव होते. सर्वाधिक निर्मिती :- 'कर्ण' या विषयावर सर्वाधिक मराठी ललित साहित्याची निर्मिती झाली आहे. साहित्यकृतींची कर्णावरील संख्या पंचवीसच्या जवळपास आढळते आणि कर्णाच्या या चिंतनाची पृष्ठसंख्याही फार मोठी आहे. प्रस्तुत प्रकरणात मराठी प्रतिभावंतांनी कर्णाविषयीच्या ललित साहित्याची जी निर्मिती केली आहे ती विचारात घ्यावयाची आहे. 'टाकलेलं पोर' ( के. सी. ठाकरे), पहिला पांडव (शि. म. परांजपे), महारथी कर्ण (वि. ह. औंधकर), कौंतेय (वि. वा. शिरवाडकर), व्यासपर्व ( दुर्गा भागवत), कर्ण (संगीतिका) (बा. सी. मर्ढेकर ), महापुरुष ( आनंद साधले), युगान्त ( इरावती कर्वे), मृत्युंजय ( शिवाजी सावंत), सूर्यपुत्र ( विजय देशमुख), राधेय ( रणजित देसाई), जीवनव्यास ( मधु भोसले) इत्यादी साहितत्यकृतींचा या साहित्यात प्रामुख्याने समावेश होतो. मराठी प्रतिभावंतांनी कलात्मक पातळीवरून जाणून घेतलेली कर्णाची मन:स्थिती, आणि त्यांच्या कर्णविषयक नव्या आकलनाला विशिष्ट कालपरिस्थितीनुसार मिळत गेलेली मती, येथे अभ्यासावयाची आहे. या साहित्यकृतीतून मराठी मनाचे हे नवे आविष्कार शोधले म्हणजे मग महाभारताचे स्थलकाल - व्यक्तिपरत्वे बदलणारे आणि वाढणारे स्वरूपही येते लक्षात येईल आणि प्रबंध सिद्धांताला अधिकच पुष्टी मिळेल. शोक-नाट्याचा नायक:- कर्ण शोकनाट्याचा नायक शोभतो. शोकाच्या भावनेचे सर्वात अधिक व्यापक आणि सखोल असे आवाहन असते. ते आवाहन करण्याचे सामर्थ्य कर्णाच्या जीवनात निश्चितच आहे. कारण कर्णाच्या जीवनात सुदशा आणि दुर्दशा आहे, सुदैव आणि दुर्दैव आहे, संघर्ष आहे, भावभावनांचे कल्लोट आहेत, सद्गुण आणि दुर्गण आहेत म्हणूनच रसिक मनाला कर्णाचे विशेष आवाहन आणि आकर्षण आहे. महाभारतात अनेक व्यक्तिरेखा आहेत. पण कर्ण हा मराठी ३४ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा