पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ नाहीत. एखादे सूत्र घेऊन त्यांना आपले स्वतःचे भाष्य करावयाचे असते. या आशयाचे विचार माधव मनोहरांनी मांडले आहेत. त्यांच्या दृष्टीने हे भाष्य - आहे, आक्षेप नाहीत. महाभारतातील व्यक्तिरेखा इहतत्त्व आणि परतत्त्वांनी युक्त आहेत. त्या मानवी आहेत. एकाच वेळी मानवाचे आणि महामानवाचे रंग घेऊन त्या अवतरल्या आहेत. आपल्या प्रतिभासामर्थ्याने साहित्यिकांना या व्यक्तींना नव्या दृष्टीने व नव्या अनुभूतीने साकार करता येते. पुराणकथेतील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले म्हणजे या चित्रणातील विविध रंग संभवनीय होतात. मग 'माणूस' शोधण्यासाठी ही व्यक्तिदर्शन अवतरतात. ३० || कर्ण आणि मराठी प्रतिभा