पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ललित साहित्यिकाची भूमिका समजावून घेऊन या पौराणिक व्यक्तीचे पारदर्शकत्व मान्य केले पाहिजे. म्हणजे मग मराठी प्रतिभावंतांनी आपल्या स्वतंत्र चिंतनाने महाभारताचे नवे आविष्कार केले आहेत, हे लक्षात येते. महाभारत दर्पणात कर्ण-प्रतिमा :- 'कर्णाच्या विपर्यस्त रूपांचा मराठी वाड्:मयसृष्टीत सुळसुळाट झाला. शेवटी श्री. अ. दा. आठवले व श्री. रा. शं. वाळिंबे यांनी या साऱ्या रूपांना जेरबंध करून वास्तव कर्णासमोर अपराधी म्हणून उभे केले. १८ प्रा. सुशीला पाटील यांच्या या विधानाचे परीक्षण करणे प्रस्तुत संदर्भात उपयुक्त ठरते. कारण कर्णविषयक लेखनाला श्री. आठवले वा श्री. वाळिंबे यांच्या लेखनाने आळा बसला असे नाही. उलट रणजित देसाई यांची नवी कादंबरी 'राधेय' यानंतरच १९७३ मध्ये अवतरली. 'मृत्युंजय' चे नाट्यरूपांतर झाले. 'तो राजहंस एक' 'अर्ध्य', 'सूर्यपुत्र' 'कर्ण खरा कोण होता ?' इत्यादी कर्णाविषयी आपले चिंतन साकार करणारी साहित्यसंपदा नावारूपाला आली, हे सारे कशाचे द्योतक आहे ? याचा अर्थ महाभारतावर आधारित साहित्याची निर्मिती सतत होत राहणार आहे. त्यात परंपरानिष्ठ व सर्जनशील लेखकाची भूमिका या दोन्हीही अस्तित्वात राहणार आहेत असे दिसते. 'महाभारत हे महाकाव्य आहे. कलावंताची प्रतिभा नि कल्पकता जे चित्र रेखाटते त्यातून त्याची जीवनाविषयक दृष्टी व्यक्त होत असते. १९९ हे. प्रा. सुशीला पाटील यांनी पुढे म्हटलेले आहेच. तेव्हा काव्यात्मक, कलात्मक न्याय हाच कलाकृतीच्या संदर्भात विचार करतांना महत्त्वाचा असतो, म्हणून त्याकडे ललित साहित्याच्या टीकाकारांनी लक्ष दिले पाहिजे. " प्रा. आठवले मोकळ्या मनाने लिहितात, या नाटक, कादंबऱ्या, कवितांचे ललित वाड्:मयाच्या दृष्टीने परीक्षण करणे हे माझ्या कक्षेबाहेरचे आहे, असे मी मानतो. २० 'व्यासपर्व' आणि 'युगान्त' या साहित्याचा 'ललित गद्यावतार' म्हणून विचार करणेच न्याय्य होईल. एकदा ही भूमिका स्वीकारली म्हणजे, आठवले म्हणतात त्याप्रमाणे 'असत्यावर आधारलेला अनिर्बंध कल्पनाविलास' या साहित्याला म्हणता येणार नाही. मात्र महाभारताशी तुलना करून साहित्यिकांनी कर्णाचे उदात्तीकरण करण्यासाठी कल्पनाविलासाचा अवलंब कसा केला आहे, हे दाखविण्याचा अधिकार जरूर या महाभारतनिष्ठ लेखकांना आहे. पण हे दाखवीत असतांना या प्रत्येकाचे कर्णाच्या जीवनाचे आकलन एक वेगळे रंगरूप आणि आकार घेऊन अवतरते, हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. विविधहेतूंनी काही मूलभूत गोष्टींचा शोध घेण्यासाठी ही निर्मिती होते. अशी नवनिर्मिती सतत होत राहणे हेच महाभारताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. येथे साहित्यिकांना महाभारत संहितेवर आक्षेप घ्यावयाचे कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ २९