पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुकम्पा निर्माण करणारे चित्र रेखाटतात. कर्ण व कृष्ण परस्परविरुद्ध पक्षात असल्याने एकूण समतोल निर्माण झाला आहे. गो. नी. दांडेकरांचे हे सारे नवे विवेचन आहे. डॉ. शं. के. पेंडसे 'आधुनिक शास्त्रांच्या (विज्ञान, मानसशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादींच्या) साहाय्याने कर्णाचे व्यक्तिदर्शन घडवितात त्यामुळे मेंदूतील मनोविकृतीमुळे कर्ण ब्रह्मास्त्र विसरला, कवचकुंडलाचे दान करूनही तो पराक्रमीच होता, असे नवे निष्कर्ष ते काढतात. कर्णाच्या जीवनातील अद्भुतता बाजूला सारून त्यांनी सरळ कृष्णाच्या कपटनीतीनेच त्याचा मृत्यू झाला आहे असे नमूद केले आहे. अ. दा. आठवले यांनी विशुद्ध महाभारतीय दृष्टिकोन स्वीकारुन (ललित व ललितेतर साहित्य तपासून ) महाभारताचे वास्तव दर्शन घडविले आहे. प्रामुख्याने दुर्गा भागवत, इरावती कर्वे, आनंद साधले, शिवाजी सावंत, वि. वा. शिरवाडकर यांच्यावर त्यांचे आक्षेप असून त्या आक्षेपाच्या संदर्भातच त्यांनी कर्णाचे जीवन विशद केले आहे. कर्णाविषयी ललित साहित्यिक अनाठायी सहानुभूती बाळगून लेखन करतात हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. वस्तुतः कर्ण असदभावपूर्वक सारे करीत असे. त्याचे शौर्य व औदार्यही सापेक्ष होते. कर्णाचे पराक्रम गैरवाजवी वाटतात. साहित्यातील कर्णचित्रण महाभारत संहितेला सोडून आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या शुद्ध महाभारतीय दृष्टीतून केले आहे. कलेची किंवा वाड्:मयीन मूल्यांची जाणीव आठवले कोठेही ठेवीत नाहीत. डॉ. रा. शं. वाळिंबे यांनीही आठवले यांच्याप्रमाणेच महाभारताची भांडारकर संस्थेची संशोधित प्रत प्रमाण मानून 'नामूलं लिख्यते किंचित्' या न्यायाने कर्ण दुष्टच होता हे साधार सांगितले आहे. डॉ. वाळिंबे यांची महाभारतनिष्ठ दृष्टी 'युगान्त' व 'व्यासपर्व' सारख्या ग्रंथातील वादग्रस्त विवेचनाच्या खंडनासाठी प्रतिक्रिया रूपात व्यक्त झाली आहे. महाभारतातील कर्णाच्या जीवनकहाणीचे वास्तवदर्शन घडविताना त्यांनी कर्णजीवनाची जी समीक्षा केलेली आहे त्यातून कर्णविषयक डॉ. वाळिंबे यांचाही एक वेगळा दृष्टिकोन साकार झाल्याचे दिसून येते. महाभारतकालीन समाजरचनेचा विचार केला म्हणजे द्रोणाचार्य, कृपाचार्य न्याय्य व योग्य वागले, कर्ण म्हणजे चांडाळ चौकडीतील एक होता. द्यूत, वस्त्रहरण यांसारख्या प्रसंगातून हे स्पष्ट होते. कर्णाच्या ठायी असत्य भाषणाचा दुर्गुण होता. त्याने आपल्या दातृत्वाचा डंका आपल्यातील 'न्यून' भरून काढण्यासाठी वाजविला. महौदार्य तेवढ्यासाठीच त्याने स्वीकारले होते. त्याला प्राणापेक्षा कीर्ती अधिक महत्त्वाची वाटे. अमोघ वासवीशक्ती घेऊनच त्याने कवचकुंडलांचे दान केले, कर्ण जर खरोखरच दानशूर असता तर त्याने मग 'अंगराज्य' स्वीकारले नसते. ऐन युद्धाच्या प्रसंगी भीष्म सेनापती आहे म्हणून कर्ण लढत नाही, यात. कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ २७