पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलाटणी दिली आहे. त्याच्या दानाला आणि मनौदार्याला तत्कालीन समाजप्रतिष्ठेची तहान होती असे त्यांनी दाखविले आहे. त्यांची समाजविषयक चिंतकाची भूमिका येथे दिसते. दानाच्या परिणामाची दखल न घेता दानाच्या प्रतिष्ठेला त्याने अधिक जपले, ब्राम्हणांकडून पूर्वी मिळालेल्या दोन शापांमुळेच त्याने ब्राम्हणाला नकार देण्याची पुन्हा हिम्मत केली नाही, अशी मौजेची प्रतिपादने येथे आढळतात.. म्हणूनच प्रेमा कंटकांचे हे 'पारंपरिक आकलन' असूनही त्यात स्वतंत्र दृष्टी आहे. स्वतंत्र प्रतिपादन आहे. त्यामुळेच महाभारताची वाढ झालेली दिसून येते. त्यात मौलिंक भर पडलेली दिसून येते. महाभारतातील घटनांची आणि व्यक्तित्वांची किती विविध तन्हांनी संगती लागू शकते हे येथे स्पष्टपणे जाणवते. एका संस्काररहित माणसाची त्याच्या हीन अभिरुचीने घडलेली शोकांतिका या स्वरूपात कर्णकथा कंटकांना जाणवते. कर्णाची स्वामिनिष्ठा सगळ्या लेखकांप्रमाणेच त्यांनीही वाखाणली आहे. कर्णाचे इमान पक्के असल्याने त्याने भीष्म, श्रीकृष्ण, कुंती, सूर्य यापैकी कोण नही ऐकले नाही हे विशेष आहे. कर्णाची आत्मप्रशंसा करण्याची लकब, दुर्योधनाच्या दुष्कृत्यांची त्याने केलेली भलावण यासारख्या व उपरोक्त नवीन स्पष्टीकरणातून शेवटी प्रेमा कंटक यांनी कर्ण हा तमोगुणी होता असाच निष्कर्ष काढलेला आहे. 'कर्णाचा जन्म धर्म लोपातून झाला आहे. नीच पुरुषांच्या आश्रयामुळे त्याची बुद्धी ईर्ष्यावश होऊन गुणी पांडवांचा द्वेष करणारी झाली. १७ कर्णाविषयीच्या भीष्माच्या या उद्गाराप्रमाणेच प्रेमा कंटकांनी कर्णाकडे पाहिले आहे. सेनापती म्हणून कर्ण दोन दिवसांपेक्षा अधिक काळ जगत नाही, हा त्यांनी आपल्या मुक्त चिंतनातून लक्षात आणून दिलेला नवा विचार आहे. संस्कारविहीनता, उच्च सामाजिक जीवन व नीतिमूल्यांचा अभाव या गोष्टींच्या संदर्भात कर्णाची अर्जुनाशी तुलना करून कर्णाची 'संस्कारविहीनता' त्या स्पष्ट करतात. तेच कर्णाच्या अध:पाताचे त्यांना मुख्य कारण जाणवले आहे. महाभारतीय दृष्टी आणि कर्ण :- महाभारतातील कर्णाची ही महाभारतानुसारी पारंपरिक दृष्टिकोनातून रेखाटलेली शब्दचित्रे पाहिल्यानंतर कर्णाचे जीवन संमिश्र, गुणदोषांनी युक्त आहे, गुंतागुंतीचे आहे हे येथे लक्षात येते. ललित साहित्यिकांप्रमाणेच समीक्षक विचारवंतांनाही कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाने आकर्षित केले आहे हे दिसून येते. यातूनच कर्णविषयक ललित, वैचारिक संशोधनपूर्ण असे संमिश्र आणि वैविध्यपूर्ण लेखन झाले आहे. कर्णाचे आव्हान व आवाहन ललित व ललितेतर अशा दोन्हीही क्षेत्रांतील लेखकांना आहे. शुद्ध महाभारतीय दृष्टीतून कर्णाकडे पाहणाऱ्या लेखकांना ललित साहित्यिकांच्या कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ २५