पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'हस्तिनापूर' मध्ये शिरवाडकरांनी लक्ष वेधले आपल्या मनात सहानुभूती निर्माण होते व फार तर डोळेझाकही करावीशी वाटते अशी दृष्टी आहे. आहे. या चित्रणामुळे कर्णाविषयी त्याच्या दोषांकडे लक्ष जात नाही. कर्णाकडे पाहण्याची शिरवाडकरांची दुर्योधनाच्या पाठीशी राहण्याची त्याची मित्रनिष्ठा मान्य करूनही अनेकदा त्याचा आत्मगौरव अनाठायी आहे हे लक्षात येते. घोषयात्रा, द्रौपदी स्वयंवर, कर्णार्जुन - युद्ध, जयद्रथवध, गोहरण इत्यादी प्रसंगी कर्णाची वल्गना व्यर्थ ठरली. अश्वत्थाम्याने 'काहीच न करता तू वृथा वल्गना करतोस' हाच आरोप त्याच्यावर केलेला आहे. म. रं. शिरवाडकर कर्ण हा अर्जुनाइतकाच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पराक्रमी होता ही कल्पना भ्रामक व निराधार असल्याचे निःसंदिग्धपणे सांगतात. येथे म रं. शिरवाडकर कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे कलात्मक आकलन सादर करीत नाहीत तर महाभारताच्या आधारे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या लेखाचे स्वरूप वैचारिक विवेचनाचे आहे. अर्जुनाशी कर्णाची तुलना करून आपला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन येथे शिरवाडकरांनी व्यक्त केला आहे. प्रेमा कंटक :- कर्णाविषयीचे आपले 'मुक्तचिंतन' प्रेमा कंटकांनी 'देव की पुरुषार्थ ?१५ या लेखांत केले आहे. कर्ण-जीवनावर एक अनोखे भाष्य लेखिकेने येथे केले आहे. सकृत्दर्शनी वाटणाऱ्या कर्णाविषयीच्या सहानुभूतीलाही लेखिकेने येथे अवसर दिला नाही. कर्णजन्मापूर्वीच्या प्रसंगांच्या अनुरोधाने प्रेमाबाईंनी कर्णाच्या स्वभावाचे विश्लेषण करण्याचा एक नवा प्रयत्न येथे केला आहे. जीवनमूल्ये आणि कर्ण :- मनाची शुद्धता आणि मनमोकळेपणाऐवजी कर्ण ईर्ष्या बाळगणारा सूड - बुद्धीचा होता हे त्यांनी परशुरामाशी त्याने केलेल्या असत्य भाषणातून दर्शविले आहे. महाभारतानुसार कर्णार्जुन तुलनेत अर्जुनाला त्यांनी अधिक गुण दिले आहेत. कर्ण शस्त्रास्त्रात निपुण होता पण व्रती व संयमी जीवनाची बैठक त्याला नव्हती हे त्यांनी मार्मिकपणे दाखविले आहे. ज्या वातावरणातील आणि विचारसरणीतील (गांधीवादी) लेखिका आहे त्याचा परिणाम त्यांच्या कर्णाच्या आकलनात जाणवतो. म्हणून अध्ययन अध्यापनाच्या प्रसंगावर लेखिकेने विशेष भर दिला आहे. नैतिक पातळीवरून कर्णापेक्षा अर्जुन श्रेष्ठ ठरविलेला आहे. या नैतिकतेच्या जीवनमूल्यांतून त्यांनी कर्णाकडे पाहिले आहे. म्हणून त्यांचे निष्कर्ष आगळे आहेत. हे वैशिष्टयपूर्ण चिंतन कर्णाच्या चिंतनाला नवी दिशा देणारे आहे. कर्णाच्या कवचकुंडलदानाला व एकूण त्याच्या औदार्याच्या भूमिकेला कंटकांनी स्वतःच्या चिंतनातून वेगळीच २४ || कर्ण आणि मराठी प्रतिभा