पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि दुर्योधन या म.रं. शिरवाडकरांना विशेष महत्त्वाच्या आणि परिणामकारक. वाटतात. त्यांनी 'अर्जुनासारख्या विलोभनीय व्यक्तिचित्राला अद्वितीय मानून कर्णाचे व्यक्तिमत्त्व अर्जुनाच्या जवळपास येणारे आहे असे म्हटले आहे. कर्णार्जुन तुलना करताना त्यांनी हे आपले मत व्यक्त केले आहे. 'कर्ण हा प्रक्षुब्ध समुद्रासारखा, तर अर्जुन हा शांत असलेल्या म सागरासारखा आहे. दुर्दैवी परिस्थितीवर मात करूनही अखेर दुर्देवापुढे बळी गेल्यामुळे कर्णाच्या भोवती एक विलक्षण तेजाचे वलय पसरले आहे. त्यामुळे कर्णाबद्दल कुणालाही आत्मीयता वाटते. १५ शिरवाडकरांचे लक्ष येथे दुर्दैवी कर्णाकडे वेधले गेले आहे. पण कर्णाभोवतीचे तेजाचे वलय बाजूला सारले तर अर्जुनाच्या तुलनेत कर्ण सामान्य वाटेल असे त्यांचे मत आहे. त्यांचा हा दृष्टिकोन महाभारताशी जवळीक सांगणारा आहे. अनुकम्पा व आकर्षण :- कर्ण पराक्रमी आहे पण तो आत्मश्लाद्या करतो. परिस्थितीच्या कचाट्यात तो सापडलेला आहे. त्यामुळे ही त्याची आत्मश्लाद्या क्षम्य ठरते. तसेच या कर्णाने द्रौपदीचा क्रूर उपहास केला, दुर्योधनाला पांडवांविरुद्ध सतत चिथावणी दिली. तरीही कर्णाचे व्यक्तिमत्त्व त्यांना विलोभनीय वाटते. अशीच स्थिती मराठीतील ललित साहित्यिकांचीही झाली आहे. त्यांनी आपल्या साहित्यकृतीत कर्णाच्या या विलोभनीय व्यक्तिमत्त्वाचेच दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. पदोपदी प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देऊन कर्ण मोठा झाला. याचा रास्त अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. कर्णाविषयी आत्मीयता वाटण्याचे हेच प्रबळ कारण सर्व ललित साहित्यिकांत प्रकर्षाने जाणवते. ह्या मुद्यालाच म. रं. शिरवाडकरांनी येथे नेमकेपणाने स्पर्श केला आहे. महाभारतीय युद्धात, चित्रांगद आणि घटोत्कचाशी झालेल्या युद्धात कर्णाचा पराक्रम स्पष्ट होतो. बेचैन करून टाकणारे कवचकुंडलाचे दान त्याचे औदार्य सिद्ध करते. कोपिष्ट ब्राम्हण आणि परशुराम यानी दिलेल्या शापामुळे कर्णाविषयी अनुकम्पा आणि आकर्षण वाटू लागते. ललित साहित्यिकांना कर्णाच्या जीवनातील याच घटना त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटायला लावणाऱ्या ठरल्या आहेत. हे खरे असले तरी कर्णाभोवतालचे अद्भुतरम्येतेचे वलय दूर सारणारे शिरवाडकरांचे हे विवेचन आहे. 'मात्र कवचकुंडलांची कथा काय किंवा शापकथा काय, त्या कर्णाबद्दल वाटणारी आत्मीयता वाढविण्यासाठीच महाभारतात अवतीर्ण झाल्या आहेत, हेही लक्षात ठेवले पाहिजे.' (पृ. ६९) कर्णाविषयी वाटणारी विशेष आस्था स्पष्ट करतांना क्षत्रिय असूनही सूतपुत्रत्व त्यांच्या वाट्याला आले आहे. परशुराम, द्रोणाचार्य यासारख्या गुरूंनी व द्रौपदीने कर्णाची मानहानी केली या घटनांकडे कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ २३