पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वरूपाचे पुस्तक असूनही येथे विचारात घ्यावे लागले आहे. कर्णचरित्रावर आणि स्वभावावर मूलगामी स्वरूपाचा प्रकाशझोत टाकण्याचा डॉ. वाळिंबे यांचा प्रयत्न 'राधेयकर्ण' मध्ये आढळतो. महाभारतकाराचा व्यक्तिदर्शनातील अलिप्तपणा जाणून घेऊन, त्या निर्मात्याचा कल विशद करण्याचाही येथे प्रयत्न आहे. शरशय्येवर पडलेल्या भीष्माला पाहून कर्ण अपराधी मनाने क्षमायाचना करतो येथे त्याची माणुसकी व्यक्त होते. त्याचप्रमाणे सर्व परिस्थितीत दुर्योधनाविषयी त्याने दाखविलेली निष्ठा असामान्य होती हे कृष्ण, कुंती यांच्या प्रलोभन, आर्जवांनाही तो झुगारतो यावरून सिद्ध होते. अशा काही कर्णाच्या गुणांची नोंद डॉ. वाळिंबे यांनी घेतली आहे. कर्णाची उपेक्षा झाली. कर्णाला आपले जन्मरहस्य केव्हा कळले, अस्त्रदर्शनानंतर ब्रम्हास्त्र प्राप्तीसाठी, कर्ण परशुरामाकडे गेला, या मुद्द्यांच्या संदर्भात त्यांनी इरावती कर्वे यांच्या प्रतिपादनाचे खंडन करून त्यांच्या लेखनातील हे मुद्दे कपोलकल्पित असल्याचे म्हटले आहे.. पण ललित लेखन, म्हणून 'व्यासपर्व' व 'युगान्त' चा विचार केल्यास डॉ. वाळिंबे यांनी केलेल्या खंडनाची तीव्रता निश्चितच कमी होते. 'कर्ण आतून जळत होता, जन्माच्या काळिम्यामुळे अगतिक झाल्याने जळत होता.' ही इरावती कर्वे यांची कर्णजीवनाची संगती, डॉ. वाळिंबे यांना निराधार वाटते. कारण अधिरथ आणि राधा यांच्या पोटचे आपण आहोत हे कर्णाला ठाऊक होते हे इरावतीबाईंचे गृहीतच निराधार होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. पण यासारखे अनेक प्रसंग ललित लेखक स्वतःच्या अनुभूतीच्या आणि अभिव्यक्तीच्या प्रकाशात पुढेमागे करतो, त्यांना नवे अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो असे म्हणता येते.. 'युगान्त' हा महाभारताचे तात्त्विक संशोधन करणारा ग्रंथ म्हणता येणार नाही कारण त्यात महाभारताची भावनिक, सामाजिक, व्यक्तिगत ललित व कलात्मक पातळीवरील संगती शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा विचार पुढील प्रकरणात विस्तृतपणे केला आहे. म. रं. शिरवाडकर :- 'हस्तिनापूर' मधील 'कर्ण आणि अर्जुन' आणि 'शल्य म्हणे 'राधेय' : दोन लेखात म. रं. शिरावाडकरांचा कर्णविषयक दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. महाभारतातील काही घटनांचा, व्यक्तित्वांचा आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या चमत्कारांचा मागोवा घेणारा 'हस्तिनापूर' हा मा. रं. शिरवाडकरांचा ग्रंथ आहे. त्यातील 'कर्णा'चे चित्र येथे पाहावयाचे आहे. महाभारतातील अनेक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण असल्या तरी कृष्ण, अर्जुन, कर्ण २२ ।। कर्ण आणि मराठी प्रतिभा