पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संभाषण या प्रसंगातून टिपली आहे. खोटे बोलून परशुरामाकडे विद्या संपादन करणारा कर्ण असत्य बोलण्याऐवजी मी जीव देईन (पृ. २३) असेही म्हणतो. हा कर्ण परशुरामाचा अपराधी असूनही परशुरामाने 'न त्वया सदृशो युद्धे क्षत्रियो भविता भुवि ॥' (शांतिपर्व ३.३३) असे उद्गार कर्णाविषयी काढले आहेत. 'तूच सर्व अनर्थाचे, वैराचे आणि कलहाचे मूळ आहेस.' असे उद्गार कृष्णाप्रमाणेच नकुलानेही काढले आहेत. डॉ. वाळिंबेना हीच, कर्णाची 'अनर्थाचे मूळ' म्हणून प्रतिमा जाणवली आहे. द्यूतक्रीडेच्या मुळाशी उघडपणे नव्हे पण प्रच्छन्नपणे कां होईना कर्ण होता, द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगात त्यांना कर्णाचा मर्यादातिक्रम विशेष तीव्रतेने जाणवतो. शापाच्या भीतीने तो पुढे त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो. पण कर्णाच्या या नीच कृत्यावर पांघरून घालण्याचा कोणी प्रयत्न करू नये, चांडाळ चौकडीचा कर्ण हा म्होरक्या होता असे डॉ. वाळिंबे साधार प्रतिपादन करतात. - स्वत:च्या प्राणापेक्षा, क्षात्रवृत्तीपेक्षाही त्याला कीतींचे मोल अधिक वाटे म्हणूनच दानशूर म्हणून त्याने डंका मिरविला असे डॉ. वाळिंबे म्हणतात. ['यस्त्वं प्राण विरोधेन कीर्तिमिच्छसि शाश्वतीम्' । ( वनपर्व २८५. ३)] कवचकुंडलाच्या दानाच्या मोबदल्यात कर्णाने मिळविलेली अमोघ वासवीशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. इंद्राने शचीसाठी कुंडले नेली ही वार्ता स्वतः कर्णानेच पसरविली. येथे कर्णाच्या उदात्त दातृत्वाचे फोलपण डॉ. वाळिंबे यांनी लक्षात आणून दिले आहे. महाभारतातील कर्णचरित्राच्या संशोधन- समीक्षेतून डॉ. वाळिंबे यांनी असे हे कर्णाविषयी काही नवे निष्कर्ष काढले आहेत. दानशूर कर्ण 'अंगराज्य' स्वीकारतो, कवचकुंडल दानात त्याची वाणिज्यवृत्ती, दांभिकपणा दिसतो, भीष्म जिवंत असेपर्यंत नं लढणे यात त्याच्या पोरकटपणाचा भाग दिसतो. कदाचित भीष्माला श्रेय जाईल अशी त्याची वृत्ती होती. यावरून कर्ण सामान्यच होता असाच या सर्व घटनांच्या अन्वयार्थातून बोध होतो. कर्णाच्या दृष्टीने काही जमेची बाजूही डॉ. वाळिंबे यांनी आपल्या या संशोधनपर ग्रंथात मांडली आहे. कुंतीच्याही अगोदर कृष्ण कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगतो. पण कर्ण फक्त पांडवांना कटू बोलल्याबद्दल खेद व्यक्त करतो. कृष्णाचेही ऐकत नाही. हाच कर्ण कुंतीच्या (विनंतीशिवायच ) मुलांच्या रक्षणाचे वचन देतो. वासवीशक्ती निर्वाणीच्या वेळी योजावयाची ही कर्णाची कल्पना कृष्ण कारस्थानाने उधळली जाते. कुंतीला दिलेल्या वचनातील कर्णाचा स्वार्थ डॉ. वाळिंबे यांनी मात्र स्वतंत्रपणे येथे उलगडून दाखविला आहे. त्याला आपल्या मनाचा मोठेपणा कुंतीला दाखविता आला, वचनाला जागण्याची वृत्ती सिद्ध करता आली. पराभूत वैऱ्याला जीवदान देण्याचे औदार्य दाखविता आले, पांडवांची मानहानी व विटंबना करून जीवदान दिल्याने मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा त्यांना झाली. अशा या नव्या निर्वचनांसाठी 'राधेय कर्ण' एक वैचारिक कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ २१