पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे ललितेतर लेखन, संक्षेपाने विचारात घेतले आहे. 'कर्णाची व्यक्तिरेखा महाभारताने जशी काढली तशीच ती मराठीत अवतीर्ण करणे हे या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे' हे प्रस्तावनेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हे कर्णचरित्र सादयन्त अधिकृत आणि सटीक असून कर्णाच्या जीवनातील घटना प्रसंगांची समीक्षा त्यात केली आहे. महाभारत कर्णाची संमिश्र व्यक्तिरेखा साकार करते. सद्गुणांवर मात करणारे किंबहुना सद्गुणांना छेद देणारे कर्णाचे दुर्गुण आहेत. कर्णाचे क्षात्रतेज, त्याचा पराक्रम त्याच्या शत्रूंनाही मान्य आहे. अशा कर्णाची उपेक्षा करून चालणार नाही हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे. कर्णवध हे धर्मसंस्थापन आहे असे युधिष्ठिराला वाटते तर कृष्ण अर्जुनाला म्हणतो, 'सर्व पापांच्या मुळाशी कर्णच आहे.' महाभारताच्या संशोधित आवृत्तीतील श्लोकांचे पुरावे देत आपल्या प्रतिपादनातील आशय डॉ. वाळिंबे यांनी साधार मांडलेला आहे. पारंपरिक दृष्टिकोन :- चंपा नगरीत 'कर्ण' वाढतो, हे कुंतीला गुप्त दूतांकडून समजले होते. 'समानधर्मे व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने दुर्योधनाशी त्याची बालपणीच मैत्री जडते. द्रोणाचार्य अर्जुनाबद्दल पक्षपाती होते. त्यावेळच्या रीतीनुसार त्यांनी अक्षत्रियाला दिलेला नकार समर्थनीय ठरतो. महाभारतकालीन समाजमूल्ये आणि जीवनमूल्ये भिन्न होती, त्या संदर्भात विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे द्रोणाचार्य, कृपाचार्यांना दोषी ठरविता येणार नाही. आज जरी त्यांचे कृत्य गर्हणीय वाटले तरी त्या काली ते न्याय्य होते असे म्हणावे लागते, ही एक महत्त्वाची गोष्ट डॉ. वाळिंबे यांनी नजरेस आणून दिली आहे. महाभारतकालीन दृष्टिकोनातून ते या सर्व घटनांचा विचार करतात हे पटण्याजोगे आहे. 'महाभारतासारख्या आपल्या राष्ट्रीय वारशाची विडंबना प्रत्यक्ष भारतभूमीतच होऊ नये याच हेतूने कर्णाच्या निमित्ताने एवढा प्रपंच अवश्य कर्तव्य म्हणून केला. १४ अनंतराव आठवले यांच्या प्रमाणेच महाभारतनिष्ठ व तर्कशुद्ध अशी डॉ. वाळिंबे यांची भूमिका आहे. या भूमिकेत कलावंताच्या नवनिर्मितीला नव्या जाणिवेला माणसाचे जीवन आणि मन उलगडविण्याच्या किमयेला थारा नाही, म्हणून या वैचारिक लेखनातून उपस्थित होणाऱ्या काही नव्या मुद्यांचाच विचार येथे करणे क्रमप्राप्त आहे. कर्णाच्या दुष्टाव्याला मुत्सद्दीपणाची आणि मार्मिकतेची जोड होती. आपण सत्यवादी असल्याचे कर्ण भासवीत असे, ही विसंगती डॉ. वाळिंबे यांनी कर्णाचे सूर्याशी २० ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा