पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धरण जे कर्णाचे काळकाढूपणाचे धोरण असा विवेचनाच्या ओघात नवा मुद्दा उपस्थित करतात. आठवले यांनी महाभारताचे (आक्षेपांच्या संदर्भात) घडविलेले वास्तवदर्शन हे निश्चित मूलगामी संशोधन म्हणता येईल पण शेवटी महाभारताकडे पाहण्याचा हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. शुद्ध महाभारतीय दृष्टिकोन आहे. त्यामुळे इरावती कर्वे, दुर्गा भागवत, शं. के. पेंडसे यांचे निबंध त्यांनी संशोधनपर व वैचारिक म्हणून गृहीत धरले. वस्तुतः हे निबंध लालित्याची, आत्मनिष्ठ अभिव्यक्तीची जोड लाभल्यामुळे 'ललितगद्य' या सदरात मोडतात. या ललित लेखकांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श या लेखनाला लाभला आहे. 'युगांत' मधील इरावती कर्वे यांचे भीम व द्रौपदी यांच्या उत्कट प्रेमाचे चित्रण या संदर्भात उल्लेखिल्यास लेखिकेच्या स्वतंत्र कल्पकतेचा प्रत्यय येईल. हीच गोष्ट 'व्यासपर्वा'तूनही 'युगांत' पूर्वीच सूचित झाली आहे. महाभारताकडे पाहण्याचा हा एक दृष्टिकोन अमान्य करता येत नाही पण विशुद्ध वाङ्मयीन दृष्टिकोनातून पाहिले तर भास, कालिदास यांनी जो मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्याच वाटेने आमचे ललित लेखन मार्गक्रमण करीत आहेत हे स्पष्ट दिसते. वस्तुतः प्रस्तुत ग्रंथात केवळ ललित साहित्याचाच विचार करावयाचा आहे, पण ज्या वैचारिक साहित्याने ललित लेखकांनाही विचार करावयास लावला त्यांचा अत्यंत संक्षेपाने येथे परामर्श घेतला आहे. डॉ. रा. शं. वाळिंबे :- 'नामूलं लिख्यते किंचित्' या प्रतिज्ञेने डॉ. रा. शं. वाळिंबे यांनी अ. दा. आठवले यांच्याप्रमाणेच 'व्यासपर्व', 'युगांत' यांसारख्या लेखनकृतीवरील प्रतिक्रियांतून आपला, ('कर्ण' आणि 'भीष्म' या महाभारतातील व्यक्तींवर ) प्रबंध सादर केला आहे. त्यांचाही महाभारतनिष्ठ दृष्टिकोन या लेखनामागे दिसून येतो. पण ज्याप्रमाणे आठवले विवेचनाच्या ओघात काही नवे मुद्दे उपस्थित करतात तसेच काहीसे डॉ. रा. शं. वाळिंबे यांच्याही बाबतीत झाले आहे. महाभारताच्या सखोल चिंतनातून त्यांचे 'राधेय कर्ण' साकार झाले आहे. ललित लेखकांच्या भूमिकेतून कादंबरीकार - नाटककारांनी केलेले लेखन एकवेळ समजून घेता येईल पण संशोधनपर वैचारिक लेखनावर त्यांच्या टीकेचा मुख्य रोख आहे. 'व्यासपर्व' आणि 'युगांत' चे स्वरूप ललित गद्यात्मकच असल्याने त्यांचाही त्यांनी ललित लेखन म्हणून विचार करायला हवा होता असे वाटते. डॉ. वाळिंबे यांनी कर्णाचे स्वतःच्या दृष्टिकोनातून चरित्रचित्रण केले असल्याने महाभारतातील कर्णाच्या व्यक्तिचित्राचे हे विश्लेषण आणि समीक्षणच असल्याने त्यांचे हे लेखन वैचारिक स्वरूपाचे आहे. 'व्यासपर्व' आणि 'युगांत' मधील लेखनाशी ते संलग्न असल्याने येथे कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ १९