पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांनी सुस्पष्टपणे मांडली आहे. श्री. आठवले यांनी महाभारतात कर्णाचे नाव पांडवांच्या घाताचे कट करणाऱ्यांच्या यादीत आहेच हे ठामपणाने प्रतिपादन करून ललित लेखकांवर हल्ला चढविला आहे. 'कर्णपक्षपात्यांना हे चांगलेच खटकते आहे. निबंध, लेख लिहिणारांना आपल्या लाडक्या मतासाठी काडीचाही आधार न मिळाल्यामुळे या प्रकरणी निसटत्या विधानापलिकडे काही करता आले नाही. पण कादंबरीकारांनी मात्र कर्णाचे दुर्योधनाच्या दुष्टतेला विरोध करण्याचे सोंग वठविले आहे. कादंबरीकारांना आधार विचारण्याची सोय कधीच नसते.' (पृ. ८६) या गोष्टीची जाणीव असूनही अ. दा. आठवले यांनी कादंबरीकार, नाटककार यांना आधार विचारले आहेत. त्यांच्या वेगळ्या भूमिकेला समजून न घेता आपल्या महाभारतनिष्ठ कर्णाच्या चित्रणाच्या आधाराने लालित साहित्यातील 'कर्णा' च्या चित्राशी तुलना केली आहे. ललित लेखकांची प्रवृत्ती आणि ललित साहित्याची प्रवृत्ती लक्षात घेता आठवले यांचा हल्ला 'ललित्यपूर्ण नवनिर्मितीच्या मुद्यावर परतवून लावता येतो. महाभारताकडे परंपरावादी आध्यात्मनिष्ठ भूमिकेतून ते पाहात असले तरी त्यांनीही कर्णाचे महनीयत्व लक्षात घेतले आहे हे विशेष म्हणावे लागते. 'कृष्णाच्या वचनाला मान न देता कर्ण दुर्योधन पक्षातच राहिला ही कर्णाच्या व्यक्तित्त्वाच्या दृष्टीने विशेष लक्षणीय अशी जमेची बाजू आहे.' 'कर्णाच्या शौय-औदार्य आदि गुणांची प्रशंसा कुणीही केली असली तरी तिचा वास्तव अर्थ प्रत्यक्ष घटनांच्या प्रकाशात जाणून घेतला पाहिजे.' असे ते म्हणतात या गोष्टीला कलानिर्मितीच्या संदर्भातही महत्त्व आहे. १३ कर्णाचे शौर्य आणि औदार्य सापेक्ष होते. त्याच्या शूरत्वाच्या ललित साहित्यात गाजावाजा होण्याइतपत कर्ण गुणी होताच पण कर्ण दिग्विजयाप्रमाणे पराभवपर्वही लक्षात घ्यायला पाहिजे. नुसत्या शौर्याचे वर्णन कर्णाविषयी ललित साहित्यिकाला वाटणारी सहानुभूती जिव्हाळाच व्यक्त करते असा त्यांचा रोख आहे. अ. दा. आठवले यांनी 'महाभारतातील कर्ण (प्रकरण दुसरे) आणि परिशिष्टात (चौथे परिशिष्ट ) 'ललित साहित्यातील कर्ण' अशी दोन कर्णविषयक प्रकरणे लिहिली आहेत. स्वतःचा वेगळा कर्ण मांडण्याची त्यांची भूमिका नाही. त्यांना फक्त महाभारत संहितेच्या संदर्भात कर्ण व कर्णविषयक ललित साहित्य तपासावयाचे आहे. मात्र त्यांनी या लेखनात काही वेळा आक्रमक व आवेशपूर्ण पवित्रा घेऊन लिहिले आहे. उपरोधाचा अवलंब केला आहे. त्यांचा सगळा रोख 'कर्णभक्तांवर' आहे, कर्णाविषयी सहानुभूतीने लिहिणाऱ्या लेखकांवर आहे. कर्णाच्या सद्गुणांपेक्षा दोषांचेच आधिक्य महाभारतात असल्याने ललित साहित्यात कर्णाचे उदात्त चित्रण येऊच नये असे श्री. आठवले यांना प्रामाणिकपणे वाटते. उलट कर्णवधाचे 'पाप्याला शिक्षा' म्हणून ते समर्थन करतात आणि 'रथचक्र १८ || कर्ण आणि मराठी प्रतिभा