पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वरूपात जाणवले आहे. कर्णही त्यात सामील झाला आहे. दांडेकरांनी या बारकाव्याला मार्मिकपणे येथे टिपले आहे. कुंती आपली खंत कृष्णाला सांगते तेव्हा कृष्ण तिची समजूत घालतांना म्हणतो - 'स्त्री जातीला किती सोसावे लागते आते !'.... सागर मर्यादाही तसे स्त्रियांचे सोसणे.' (पान १८० ) 'कर्णायन' मध्ये दांडेकरांनी वर्णिलेली, 'युधिष्ठिर वनवासी होईल म्हणून आपले जन्मरहस्य त्याला कळू नये' ही कर्णाची इच्छा त्याच्या व्यक्तित्वाला फार मोठी उंची प्राप्त करून देते. येथे कर्ण एक मोठा दिलदार माणूस म्हणून गो. नी. दांडेकर चित्रित करतात. 'अर्जुना ! विजयी हो, हा आशीर्वाद कर्णाचा. ' एवढे मोठे मन या कर्णाचे आहे. द्रौपदीची मनोमनी इच्छा असलेल्या कर्णाला अनपेक्षितपणे उपरती होते. तो म्हणतो, 'द्यूत प्रसंगी माझ्या तोंडून अनुचित शब्द निघून गेले.' तुझ्या सुनेला सांग....' या रणयज्ञात कर्णाची आहुती पडेल, तेव्हा त्याच्यासाठी तुझ्या नेत्रामधून दोन आसवे गळू दे ?' (पृ. २०५) दांडेकरांनी कर्णाच्या व्यक्तित्वाला दिलेली ही कलाटणी हृदयस्पर्शी व कलात्मक नव-निर्मितीचा प्रत्यय देते. 'दोन माता, तीन तात तरीही अनाथ' अशा दुर्दैवी मुलाची याहून मनोरंजक कहाणी तुम्ही ऐकली आहे काय ?' (पृ. १८९) या प्रश्नातच गो. नी. दांडेकरांच्या 'कर्णायन'चे सारे सार आलेले आहे. मात्र 'कर्णायन' मध्ये कर्णाचे गृहजीवन अवतरू शकले नाही. कर्णाला एक माणूस म्हणून नंतरच्या ललित लेखकांनी विचारात घेतलेला आहे. अर्थात आपल्या कल्पनेचे अनेकविध रंग मूळ कथेत भरून दांडेकरांनी कर्णायन रंगविले आहे. महाभारतनिष्ठ लेखनातही हे नावीन्य आढळते आणि त्यामुळे महाभारतात नवी भर पडते यामुळेच या पारंपरिक आकलनातूनही महाभारत वाढते हे प्रत्ययाला येते. अ. दा. आठवलें :- अ. दा. आठवले यांनी 'आक्षेपांच्या संदर्भात' महाभारताचे वास्तवदर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या विवेचनाच्या ओघात कर्णाची प्रतिमा महाभारताच्या संहितेनुसार चित्रित केली आहे. त्यांची भूमिका महाभारतातील कर्णाची व्यक्तिरेखा सादर करण्याची आहे. पारंपरिक आहे. ललित साहित्यिकाची नाही. ऐतिहासिक 'व्यक्ती' म्हणून भारतीय संस्कृतीच्या संदर्भात आठवले, वाळिंबे, पणशीकर इत्यादी विचारवंतांनी 'कर्णा'कडे पाहिले आहे. 'माझे कर्णाशी भांडण नाही. कर्णाविषयी द्वेष, मत्सर तर नाहीच नाही. दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादी कौरवांपेक्षा तो पुष्कळ चांगला होता हे मला मान्यच आहे. पांडवांपेक्षा तो थोर नव्हता असे माझे मत आहे आणि ते मी साधार विस्ताराने आतापर्यंत सांगितलेले आहे. " ही कर्णाविषयीची त्यांची ठाम भूमिका आहे आणि ती ११२ कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ १७