पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केलेले अमंगळ भाषण उभे राहते ना.' पण येथे कर्णाचे उदात्त चित्रण न होता उलट तो मनात सूडबुद्धी वागविणारा आहे. 'जशास तसे' या न्यायाने तो वागतो. हे उघड होते, वस्तुतः द्यूतात तो मनापासून सामील नाही, तो औदार्यशील आहे. पण 'तुझ्यासाठी मी मेरूपर्वतद्धा गदगदा हलवीन' ही दुर्योधनाविषयीची कर्णाची निष्ठा प्रसंगविशेषी उफाळून येते. पांडव मृत झाल्याच्या कल्पनेने कर्ण म्हणतो...' वैरे मृत्यूपर्यंतच टिकत असतात दुर्योधना.' तेव्हा प्रातः काली तर्पण करताना त्यांना एखादी तिलांजली वहा' (पान १५४) अशा काही प्रसंगातून गो. नी. दांडेकरांनी कर्णाच्या चांगुलपणाचे दर्शन घडविले आहे. कल्पनेचे विविध रंग :- महाभारतातील कर्णाच्या, कर्ण या पौराणिक व्यक्तीच्या आराखड्यात दांडेकर विविध प्रसंगांच्या निमित्ताने कल्पित रंग भरतात. विराटाशी युद्ध खेळतांना द्रोणाचार्यांवर कर्ण भरपूर तोंडसुख घेतो. कर्मकांडात मप्र असलेल्या ब्राम्हण समाजावर टीका करण्याची संधी येथे दांडेकरांनी घेतली आहे. अश्वत्थामा, कृपाचार्य या टीकेने रागावून अर्जुनाच्या तुलनेत कर्णाचा पराक्रम विशेष नसल्याचे उघडपणे बोलू लागतात. (पृ. १५९) यावर आपले सारे मार्ग दैवाने बंद केल्यामुळे ईर्षेने मिळविणे शक्य आहे असे महत्त्वाकांक्षी कर्णाचे उद्गार आहेत. गो. नी. दांडेकरांनी कवचकुंडलदानाच्या प्रसंगातून कर्णाच्या मनाचे अत्यंत हृद्य आणि कलात्मक विश्लेषण केले आहे. त्यांनी कर्णाच्या मनातील भाक्कल्लोळांना चित्रित करण्यात अपूर्व यश मिळविले आहे. 'देवराज मागायला आला हेच मला पुरे'.... 'मी काहीही मागत नाही.' (पृ. १७४) यानंतर गो. नी. दांडेकरांनी रंगविलेला सूतपुत्रत्वाच्या मर्यादांची सतत जाणीव बाळगणाऱ्या कर्णाच्या मनातील झगडा मुळातूनच पाहण्याजोगा आहे. रे कर्णा, व्यर्थ तुझे सामर्थ्य' अर्जुनाशी वैर का? आपल्याला द्रौपदीविषयी कामना आहे ? या प्रश्नांनी हा कर्ण वेढलेला आहे, अस्वस्थ झाला आहे. 'द्रौपदी तुझ्या घरी आली असती, तर तिला काय लाभले असत ?' 'सूतकुळींची सून घोडे हाकणारांच्या कुळाची !.' ते उद्यानांतले नवमल्लिकेचे रोप तू तुझ्या बोरी बाभळींच्या वनी लावणार होतास - ! (पृ. १७५ ) या उद्गारातून कर्णाची सारी व्यथा साकार झाली आहे. 'कर्णावाचून मला विषप्राशनच केले पाहिजे' ही कर्णविरहित दुर्योधनाची स्थिती आहे. तो कर्णाला 'जगदेकवीर अद्वितीय - मित्र' या उपाधी बहाल करतो यावरून कर्ण दुर्योधन यांच्या उत्कट मित्रत्वाची कल्पना येते. 'कर्णायन' मधील कुंतीला, द्रौपदीची अप्रतिष्ठा झाल्याचे दुःख अत्यंत तीव्र १६ || कर्ण आणि मराठी प्रतिभा