पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळा ते पटण्याजोगे स्पष्टीकरण होण अवघड असते.' पण ही कारणमीमांसा मात्र नव्याने पेंडशांनी सांगितली असल्याने वैचारिक स्वरूपाचे लेखन असूनही ते वाचनीय झाले आहे. कवचकुंडले गेल्याने कर्णाला मरण आले असे म्हणणे त्यांना योग्य वाटत नाही. कारण कुंडलांच्या दानानंतरही त्याने अनेक महावीरांना पराभूत केले. कर्णाच्या मृत्यूला मानसशास्त्रीय स्पष्टीकरण ते जोडतात. पेंडशांनी जागोजाग दिलेले शरीरशास्त्रीय स्पष्टीकरण पटण्याजोगे न होता काहीसे हास्यास्पद वाटते. रथचक्रउद्धरण व ब्रम्हास्त्र - विस्मरण या प्रसंगाचेही त्यांचे स्पष्टीकरण याच कोटीतील आहे. कर्णाच्या जीवनाकडे भौतिक व आधुनिक दृष्टीने त्यांनी पाहिले. त्यामुळे कर्णाच्या जीवनातील अद्भुतता कमी झाली आहे. गो. नी. दांडेकर :- गो. नी. दांडेकरांनी आपल्या 'कर्णायन' मध्ये तात्त्विक बाजूची फारशी दखल न घेता मानवी पातळीवरून महाभारतानुसारी भूमिकेतून कर्णाच्या चरित्र - निवेदनाचा प्रयत्न केला आहे. परिस्थितीमुळे कर्णाला अपमानित जिणे जगावे लागले. अर्जुनाशी तुल्यबळ असूनही समाजातील वृद्ध नेत्यांकडून त्याच्या गुणवत्तेची फारशी कदर झाली नाही. त्याला फारसे प्रोत्साहनही मिळाले नाही. याचा परिणाम म्हणून अर्जुनाविषयी त्याला ईर्षा निर्माण झाली आणि इर्षेच्या पोटी मत्सर आला. परिस्थितीने लादलेल्या शत्रुत्वामुळे कर्णाचे व्यक्तिमत्त्व झाकाळून गेले. विद्यार्जनासाठी त्याने केलेली तपश्चर्या निर्हेतुक नव्हती, म्हणून ब्रम्हास्त्र प्राप्त करून घेण्यासाठी तो असत्य बोलण्यास प्रवृत्त झाला. कर्णाने गुरूची फसवणूक केली अशी कर्णाच्या अपयशाची कारणमीमांसा श्री. दांडेकरांनी 'कर्णायन' मध्ये सूचित केली आहे. कर्णाच्या अंगच्या अनेक गुणांची प्रशंसा केली असली तरी त्यांची कर्णासंबंधीची भूमिका परंपरावादीच आहे हे येथे लक्षात येते. कर्णाच्या जीवनाची शोकांतिका झाल्याचा निर्वाळा गो. नी. दांडेकरांनी दिला आहे. विवेचनाच्या ओघात 'प्रा. बापट - गोडबोले' यांनी याच मुद्याला स्पर्श केला आहे.' कर्णायनमधून कर्णाच्या भग्नांश जीवनाची कहाणी हृदयस्पर्शी शैलीत गो. नी. दांडेकरांनी वाचकांसमोर ठेवली आहे. कर्णाच्या भावजीवनाचे, आकांक्षांचे, त्याच्या व्यथांचे, शल्यांचे नि आंतरिक समरप्रसंगांचे दर्शन वाचकांना घडवावे या उद्देशाने 'श्रीकर्णायन' वाचकांसमोर ठेवले आहे. गो. नी. दांडेकरांनी 'कर्णायन' मध्ये दुर्वासाची कुंतीने कुमार वयात केलेली सेवा, तिला झालेली वरप्राप्ती, कौरवपांडवांबरोबर त्याचे अध्ययन, धनुर्विद्या, परीक्षेच्या वेळी अर्जुनाशी घडलेला कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ११