पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 कर्णाच्या जीवनात सूचित केले आहे. 'कर्णाच्या जीवनात नियतीने एक महत्त्वाची धूमिका बजावली आहे' असे म्हणून त्यांनी फारसे परंपरा न सोडणारे असे आपले स्वतःचे विश्लेषण स्पष्टपणे मांडले आहे. महाभारतीय स्वभावचित्रमालेतील पहिली व्यक्तिरेखा म्हणून साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांनी 'महारथी कर्ण' लिहिले आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कर्णाच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे... तरी भारतीय युद्ध घडवून यावयास जी अनेक कारणे झाली त्यात महारथी कर्ण याची राजा दुर्योधनासारख्या स्वार्थांध कलिपुरुषाशी घडलेली मैत्री व कर्णाचा महत्त्वाकांक्षी स्वभाव हे सर्वांत महत्त्वाचे कारण होते. ' '... जर एकटा कर्ण कौरवांच्या पक्षाला नसता तर एकतर युद्धापर्यंत प्रसंगच न उद्भवता. दुर्योधनाच्या साम्राज्याकांक्षेचे निर्माल्य होऊन राहिलें असते व युद्धाचे भारत जरी उद्भवले असते तरी त्याचे महाभारत निश्चितच घडून आले नसते. या दृष्टीने महाभारतातील कर्णाचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अभ्यसनीय आहे. किंबहुना महाभारताच्या इतिहासाची गुंतवण उकलण्यास कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास व त्याचे परीक्षण सर्वांत अधिक आवश्यक आहे. ६ प्रस्तावनेतील हा उल्लेख मुळातून येथे उद्धृत करण्याचे कारण बाळशास्त्रींच्याच शब्दांत त्यांची भूमिका त्यात स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. महत्त्वाकांक्षी कर्ण आत्मकेंद्रित आणि अहंकारी बनत गेला, स्वार्थ साधण्यासाठी कौरवपक्षाचा आणि कौरवपांडव वैराचाच अवलंब करीत राहिला. आयुष्याच्या अखेरी पांडव आपले भाऊच आहेत या जाणिवेने कर्णाला आजवर केलेल्या कृत्यांमुळे अपराधीपणाची जाणीव झाली. एका सद्गुणी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत तत्त्वांचा शोध घेऊन, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बोध करून देण्याचा बाळशास्त्रींचा हा प्रयत्न आहे. महाभारतानुसार कर्णचित्र रेखाटणारे बाळशास्त्री हरदास येथे कर्णाविषयीचे स्वतःचे वेगळे विश्लेषण सादर करतात. यावरून महाभारतातील पारदर्शक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कर्णासारख्या व्यक्तींच्या चित्रणात लेखकाची भूमिका मिसळतेच. त्यामुळे महाभारतातील व्यक्तींचे लेखकाचे चित्रण भिन्न होते आणि त्या व्यक्तिचित्रणालाही नवे धुमारे फुटतात. शं. के. पेंडसे :- महाभारतातील कर्णाला स्वतंत्र दृष्टिकोनातून आपल्या व्यक्तिदर्शनपर ग्रंथात चित्रित करण्याचा प्रयत्न शं. के. पेंडसे यांनी केला आहे. कुसंगतीमुळे कर्णाचे सगळे सद्गुण मातीमोल झाले हे त्यांचे प्रतिपादनाचे मुख्य सूत्र आहे. मनोविश्लेषणाला कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ९