पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमर्याद महत्त्वाकांक्षेच्या पिशाचिनीचा उदय झाला, अशी महाभारतकाराची मांडणी आहे', असा कर्णाविषयी निष्कर्ष काढला आहे. बाळशास्त्री हरदासांना महाभारताच्या घडणीत कर्णाच्या व्यक्तिरेखेचा सिंहाचा वाटा आहे असे वाटते म्हणूनच कर्णाच्या व्यक्तिमत्वासंबंधी अनेक परस्परभिन्न मते प्रचलित असूनही त्याचे व्यक्तित्त्व त्यांना विशेष अभ्यसनीय वाटते. याचे कारण कर्णाचा करूणामय शेवट हा वाचकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातो असे त्यांना वाटते. आपली परंपरावादी भूमिका असूनही बाळशास्त्रींनी एक महत्त्वाचा समतोल येथे साधला आहे. तो म्हणजे कर्ण केवळ विरोधी कौरव पक्षातील म्हणून त्याच्या सद्गुणांकडे ते दुर्लक्ष करीत नाहीत. " महाभारताच्या इतिहासात महारथी कर्णाचे महत्त्व अनन्यसामान्य आहे. किंबहुना पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांच्यानंतर या इतिहासाच्या घडणीवर ज्याच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा परिणाम झालेला दिसून येतो अशी कर्ण ही एकच व्यक्ति होय. ४ असे असूनही त्यांनी कर्णाला न्याय दिला आहे. बाळशास्त्री काहीशा अतिशयोक्तीनेच 'कर्ण नसता तर भारताचे महाभारतही झाले नसते. असे ते म्हणतात. कर्णाच्या व्यक्तिचित्रणात त्यांना अद्भुतता आणि अस्वाभाविकता यांचा स्पर्शही जाणवत नाही. (पृ. २४०). त्याचप्रमाणे बाळशास्त्रींनी 'कर्ण ही या बहुरत्ना वसुंधरेत वारंवार पुनरावृत्ती होणारी घटना आहे' हेही अचूकपणे हेरले आहे.. दुर्योधनाच्या मैत्रीच्या फेन्यात सापडल्याने कर्ण राजसिंहासनाचा उत्तराधिकारी असूनही वंचित राहिला, शिवाय योग्य वेळी त्याला आपण 'कौंतेय' आहोत हे समजले नाही आणि जेव्हा समजले तेव्हा वेळ निघून गेलेली होती. त्यामुळे कर्णाच्या साऱ्या जीवनालाच वेगळे वळण लागले. एक भलतीच कलाटणी मिळाली असे बाळशास्त्री हरदासांचे प्रतिपादन आहे. पुराणकथेतील घटनांच्या मुळाशी असलेला कार्यकारणसंबंध स्पष्ट करता येत नाही, कर्णाच्या बाबतीत असेच घडते. म्हणून बाळशास्त्रींनी कुंतीला निर्दोष दाखविले व तिच्या कृत्याचे समर्थन केले आहे. पुढे गो. नी. दांडेकरांनीही अशाच प्रकारे राजकुमारी कुंतीची विशिष्ट परिस्थितीतील ही एक कृती म्हणून सहानुभूतीने सावरण्याचा प्रयत्न केला आहे. 'कर्ण - कुंती' यांच्याकडे पाहण्याची बाळशास्त्रींची भूमिका येथे लक्षात घेतली पाहिजे. ते लिहितात, “तात्पर्य, कुंतीच्या भूमिकेचा मनुष्यस्वभावातील स्वाभाविक अपूर्णता ध्यानात घेऊन विचार केला म्हणजे तिला दोष द्यायला जागाच उरत नाही. तसेंच कर्णाला ज्या परिस्थितीत देवानें अकारण आणून सोडले तिचा विचार केला तर संतापण्याबद्दल त्यालाही काहीच दोष देता येत नाही." त्यांच्या या चिंतनात कर्ण - कुंतीविषयी सहानुकंपा दिसून येते. पुराणकथेत महत्त्व असलेले नियतीचे सूत्र मात्र त्यांनी ८ ॥ कर्ज आणि मराठी प्रतिभा