पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळशास्त्रींच्या दोन लेखनकृती वैचारिक आहेत. पण त्यांनी 'महारथी कर्ण पुस्तकात कर्णाच्या चरित्र कथनाचा प्रयत्न केला आहे. बाळशास्त्री हरदासांनी कर्णाचे चरित्ररूपाने हे जे दर्शन घडविले आहे. त्यापूर्वी अशाच स्वरूपाचा एक प्रयत्न श्री. वि. स. वाकसकर यांनी आपल्या 'राधेय कर्णचरित्र' मध्ये केला आहे. परंपरानिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून संस्कृतीतील कर्णाची व्यक्तिरेखा मराठीमध्ये आणण्याचा सुरूवातीचा हा प्रयत्न आहे. त्यात कर्णाची राजनिष्ठा, निःस्पृह स्वामिनिष्ठा, सत्यप्रियता, कर्तव्यदक्षता, मित्रप्रेमाविषयीची जागरूकता दाखविली आहे. त्याच्या या सद्गुणांप्रमाणेच क्रोधी, मत्सरी, खुनशी, अनीतिमान, इ. दुर्गुणांचे वर्णन केले आहे. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त असे कर्णाच्या स्वभावाचे महाभारतानुरूप दर्शन येथे घडते. कर्णाच्या प्रयत्नवादी वृत्तीची प्रखरता येथे थोडी अधिकच वर्णिली आहे. 'प्रत्यक्षशत्रू' हा 'हितशत्रू' पेक्षा लाखपटीने चांगला आहे हे शल्याला निःसंदिग्धपणे सांगणारा हा कर्ण अभिमन्यू- बधात सहभागी होतो. त्यांनी कर्णास पांडवांकडून होणारे जयपराजय महाभारतानुसार सांगून सामाजिक चिंतनाचा स्पर्श कर्ण-जन्मकथेच्या निमित्ताने केला आहे. कुंतीला मंत्रसामर्थ्याने वयाच्या अठराव्या वर्षी कर्णाची प्राप्ती होते. यावर भाष्य करताना वाकसकरांनी त्यावेळची वैवाहिक बंधने शिथिल असली तरी सुप्रजाजननासाठी या गोष्टीचे उदात्तीकरण केलेले आडळते. असे अनुमान काढले आहे. पण यापेक्षा वेगळा असा लेखकाचा ठसा या चरित्रकथेवर उमटलेला आढळत नाही म्हणून हे कर्णचरित्र विशेष लक्षणीय ठरत नाही. महाभारतातील कर्णाच्या व्यक्तिरेखेला सोप्या पद्धतीने सांगण्यापलीकडे फारसे या चरित्रातून साधलेले नाही. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या कर्णाचे रूप विशेष उठावदार आहे. बाळशास्त्री हरदास यांनी कर्णाच्या चित्रणाला महाभारताच्या आधाराने साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. सुष्ट पात्रांना बाळशास्त्रीच्या सात्विक मनोवृत्तीमुळे त्यांच्या व्याख्यानग्रंथात विशेष महत्त्व त्यांनी दिले आहे. कर्णाचे चरित्र रेखाटताना बाळशास्त्री त्याचे एकूण गुणदोष वर्णन करतात. . कर्णाच्या ठिकाणी शूरत्व आणि दातृत्व आहे. दुर्योधनाच्या दुष्कृत्याचा तो एक मित्र म्हणून भागीदार झाला आहे. अर्थातच यामुळे पांडवांचा तो प्रमुख विरोधक बनला. अर्जुनाचा द्वेष करूं लागला. कर्णाला त्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा प्रत्येक वेळी उद्युक्त करते. महाभारतात कर्णाच्या दिग्विजयाबरोबरच पराभवही वर्णन केलेले आहेत. बाळशास्त्री हरदासांनी 'एका अनिवार्य सामाजिक घटनेतून कर्णाची आत्मकेंद्रितता जन्म पावली, त्या आत्मकेंद्रिततेतून त्याचा अहंकार जन्म पावला व त्या अहंकारतूनच कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ७