पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

i ! लेखक पाहतात. पुराणकथा म्हणून पाहत नाहीत. पुराणाच्या सुदूरतेमुळे त्यातील कार्यकारण भावांची संगती लागत नसल्यामुळे, त्यात भवितव्यता आणि नियतीला स्थान असल्यामुळे पुराणाचा वेगळ्या भुमिकेतून विचार करायला हवा ही भूमिका या लेखकांची नाही. " इतिहासकथांच्या मानाने पुराणकथा अधिक दूरच्या अधिक धूसर अधिक अद्भुत असतात. बहुतेक पुराणकथांतून इतिहास, दंतकथा, संकीर्तन, प्रतीके, चमत्कार, सांस्कृतिक आग्रह इ. चे विवेकाविरोधी आणि तरीही आकर्षक असे मिश्रण झालेले असते. पौराणिक वास्तव हे मर्यादित अर्थाने आणि स्थूल मानानेच वास्तव मानायला हवे. म्हणूनच ललित लेखकांच्या कल्पकतेला आणि स्वतंत्र आकलनाला तिथे भरपूर अवसर असतो. कालिदासाने 'शाकुंतल' मध्ये अथवा भासाने 'प्रतिमा'मध्ये मूळ पुराणकथा कितीतरी बदलून टाकल्या आहेत. लोकांनी स्वीकारलेल्या स्थूल घटना सुरक्षित ठेवून ललित लेखक मूळ कथेतील रिकाम्या जागा आपल्या दृष्टिकोनानुसार भरून काढतो, सूचित असलेले सूत्र वाढवितो, अथवा इतस्ततः विखुरलेले कण एकत्र करून त्यातून नवे आकार आशय निर्माण करतो. म्हणून अशी कलाकृती स्वतंत्र निर्मिती असते. केवळ अनुवाद नसतो. हे स्वातंत्र्य लेखकाला कोणी द्यावे लागत नाही. अथवा ते कोणाकडे मागावे लागत नाही. नाट्यादी ललित साहित्याचा जन्म झाला तेव्हापासून ते अस्तित्वात आहे. "" ही प्रस्तुत ग्रंथात महाभारताधिष्ठित ललित साहित्याच्या अभ्यासासाठी स्वीकारलेली भूमिका आहे. 'कर्ण: नवे आकलन' या स्वतंत्र प्रकरणात त्याचा विस्ताराचे विचार मांडला आहे. या प्रकरणात कर्णाचे पारंपरिक आकलन करणाऱ्या बाळशास्त्री हरदास, वाळिंबे, आठवले, पणशीकर इत्यादींच्या कर्णविषयक लेखनांतही स्वतः लेखकांचा दृष्टिकोन कर्णाविषयी लेखन करताना मिसळलेला दिसतो. त्यामुळे उलट या ग्रंथात स्वीकारलेल्या भूमिकेला अधिक बळकटीच येते. महाभारतनिष्ठा सांगणारे भाष्यकारही जेव्हा कर्णाची स्वतःच्या व्यक्तीच्या स्पर्शाने चित्रणे रेखाटू पाहतात, तेव्हा त्यांच्या कर्णाकडे पाहण्याच्या भूमिकेत आणि दृष्टिकोनातही (क्वचित निष्कर्षातही) फरक पडलेला दिसून येतो. यावरून महाभारतातील व्यक्तिरेखांचे वैशिष्टय लक्षात येते. या व्यक्तिरेखा पारदर्शक आहेत, संमिश्र, बहुमिती असलेल्या आहेत म्हणून त्यांच्या चित्रणाला अनेक पदर, अनेक परिमाणे लाभतात. 'फाटे फुटतात'. महाभारताला अनुलक्षून रेखाटलेल्या या कर्णाच्या विविध चित्रणातून मराठी लेखकांनी महाभारताच्या आशयाला दिलेला नवा आकार, महाभारताची कर्णकथेच्या संदर्भात त्यांनी केलेली वाढही स्पष्ट होईल. बाळशास्त्री हरदास :- 'महाभारतातील व्याख्यानें' मधील 'कर्ण' आणि स्वतंत्र महारथी कर्ण' या ६ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा