पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बळावते. पण इंद्र कर्णाची कवचकुंडले कपटाने हिरावून घेतो. सूर्याने बजावूनही कर्णाने दिलेल्या या दानात त्याची दानत दिसते. कवचकुंडलदानाच्या मोबदल्यात कर्ण इंद्रापासून वासवी शक्ती मिळवितो. सुरूपता अभंग ठेवतो, वस्तुतः ती वासवी शक्ती त्याने अर्जुनवधासाठी जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण कृष्णाच्या सल्ल्याने घटोत्कचाशी झालेल्या अनावर युद्धात त्याची वासवी शक्ती खर्च होते. कर्ण सेनापती झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या अटींसह शल्य त्याला सारधी म्हणून लाभतो. युद्धारंभी शल्य कर्णाची निर्भत्सना करतो पण कर्णाच्या पराक्रमाने दिपून जातो व नंतर तो त्याला प्रोत्साहन देतो. कर्णाचा मुलगा वृषसेन यावेळी युध्दात मारला जातो. यानंतर शापित कर्ण रथाचे चाक काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन त्याचा वध करतो. कर्णवध झाल्याचा आनंद कुंतीने गौप्यस्फोट केल्यानंतर टिकत नाही. उलट पांडवांना कर्णाच्या निधनाचे दुःख होते. अशी ही महाभारतातील सर्वज्ञात कथा आहे. तीत दुर्योधनाच्या दुष्टाव्यात कर्ण प्रत्येक वेळी सहभागी होतो आणि अहंकाराच्या व सूडाच्या भावनेने वावरतांना दिसतो. द्रौपदीवर कोसळलेल्या द्यूत हरल्यानंतरच्या अनवस्था प्रसंगात तो तिची 'बंधकी' म्हणून संभावना करून दुःशासनाला वस्त्रहरणाला चिथावणी देतो. असा हा कर्ण महाभारतात अनेक चांगल्या गुणांनी आणि दुर्योधनाशी मैत्री केल्याने अनेक दुर्गुणांनी, दुष्प्रवृत्तींनी भरलेला चित्रित केला आहे. कौरवांना कर्ण फार मोठा आधार वाटतो. महाभारतात कर्णाचा करुण अंत होतो. कर्ण आणि मराठी साहित्य :- मराठीतील कर्णविषयक साहित्याचे स्वरूप पाहिले असता साहित्यिकांच्या प्रवृत्तीनुसार त्याचे 'कर्ण पारंपरिक आकलन' व 'नवे आकलन' असे दोन भाग करता येतात.

या पहिल्या भागात महाभारतातील 'कर्णा' कडे परंपरावादी दृष्टीने पाहणान्या साहित्यिकांच्या साहित्याचा विचार करावयाचा आहे. यामध्ये 'नामूलं लिख्यते किंचित्' या प्रतिज्ञेने एखाद्या ऐतिहासिक सत्यासारखेच कर्ण कथेला जपणारे, शब्दरूप देणारे लेखकही विचारात घ्यावे लागतात. 'राधेय कर्णचरित्र' (वि.स. वाकसकर), 'भारतीय वीरदाता कर्ण' (का. रं. वैशंपायन), 'महारथी कर्ण' व 'महाभारतावरील व्याख्याने'(बाळशास्त्री हरदास), 'महाभारतातील व्यक्तिदर्शन' (डॉ. शं. के. पेंडसे), 'कर्णायन' (गो. नी. दांडेकर), 'महाभारताचे वास्तव दर्शन' ( अनंतराव आठवले), राधेय कर्ण ' (डॉ. रा. शं. वाळिंबे), 'कर्ण खरा कोण होता ? ' ( दाजी पणशीकर ) ४ ॥ कर्ण आणि मराठी प्रतिभा