पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

> कर्णाला त्याच्या अपराधामुळे दोन शाप मिळतात. 'ऐनवेळी ब्रम्हास्त्रविद्या विस्मरण होईल व 'युद्धात भूमी रथचक्र गिळील' असे ते दोन शाप होते. मात्र ए क्षत्रिय योद्धा म्हणून लौकिक वाढेल' हा वरही कर्णाला मिळतो. आपल्या मल्लयुद्धातील पराक्रमाने तो जरासंधाचा स्नेह संपादन करतो आणि 'मालिनी' नगराचा तो मालक होतो. त्याचे 'जन्मवृत्त' त्याला स्वत:ला अज्ञात राहते म्हणून रंगशाला प्रसंगी कर्णाला उपेक्षा सहन करावी लागते. कृपाचार्यांच्या कुलवृत्तान्त - प्रश्नाला त्याच्याजवळ उत्तर नसते. 'सूतपुत्र' म्हणूनच त्याची संभावना केली जाते. त्यावेळी दुर्योधन कर्णाला 'अंगराज' म्हणून राज्याभिषेक करतो आणि त्याच्याशी कायमची मैत्री संपादन करतो. हा प्रसंग डोळयासमोर घडत असून कुंतीला मौन पाळावे लागते. या घटनेपासून कर्ण हा दुर्योधन, दुःशासन, शकुनी यांच्यापैकी एक होतो आणि संपूर्ण महाभारतात पांडवद्वेषाच्या कुटिल कारस्थानात सहभागी होतो. 'चांडाळ चौकडी' म्हणून या चौघांचा निर्देश केला जातो. तरीही कर्ण अखेरपर्यंत दुर्योधनाशी केलेली मैत्री टिकवून ठेवतो. कर्णाचे सूतकन्यांशी विवाह होतात आणि त्यांच्यापासून त्याला पुत्रप्राप्तीही होते. कर्णाच्या महत्त्वाकांक्षी अहंकाराला दुर्योधन अधिक खतपाणी घालतो, फुलवितो. वेळोवेळी कर्णाची सूतपुत्र म्हणून उपेक्षा होते. द्रौपदी स्वयंवराच्यावेळी धृष्टद्युम्न पण जाहीर करताना 'कुलेन', 'बलेन' श्रेष्ठ अशा पण जिंकणाऱ्या वीराशीच द्रौपदी विवाह करील अशी अट सांगतो, तरीही कर्ण त्यावेळी मत्स्यवेध करण्यास पुढे सरसावतो, तेव्हा द्रौपदी 'मी सूतपुत्रास वरणार नाही' असे जाहीरपणे सांगते, त्यामुळे त्याला अपमानित होऊन मागे सरावे लागते. कृष्ण-कर्ण संवाद आणि कुंती -कर्ण संवाद हे कर्णाच्या जीवनातील महत्त्वाचे आणि महनीयता प्राप्त करून देणारे प्रसंग आहेत. शिष्टाई असफल झाल्यानंतर कृष्ण कर्णाला जन्मवृत्त सांगतो. पण पांडवपक्षाला मिळण्याची वेळ निघून गेल्यामुळे आणि दुर्योधनाला दिलेले मैत्रीचे वचन पाळणे आवश्यक असल्यामुळे कर्ण कृष्णाला नकार देतो. कर्ण आणि कुंती यांच्या भेटीत 'तुझे पाच पुत्र जिवंत राहतील' मात्र 'अर्जुन किंवा मी' या त्याच्या अभिवचनातून कर्णाच्या मनाचा मोठेपणा दिसतो. पुढे युद्धात तो अर्जुनाशिवाय अन्य पांडवांना मारीत नाही. धर्मराजालाही तो जीवदान देतो, मात्र पांडवांशी समेट करीत नाही. महाभारतात द्रौपदीवस्त्रहरण, घोषयात्रा-प्रसंग, उत्तरगोग्रहण, आणि अखेरचे अर्जुनाशी झालेले युद्ध या सर्व ठिकाणी कर्ण पराभूत झाला आहे. भीष्म आणि द्रोणांनंतर कर्णाकडे सेनापतीपद येते. भीष्मही कर्णाला त्याचे जन्मवृत्त सांगून युद्धापासून त्याला परावृत करण्याचा प्रयत्न करतो पण तेही आता त्याच्या दृष्टीने व्यर्थच असते. कर्गाच्या दिग्विजयानेच आपण पांडवांना जिंकू शकू ही आशा कौरवपक्षात कर्ण आणि मराठी प्रतिभः ॥ ३