पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ कर्णाचे विशेष आकर्षण :- महाभारताधिष्ठित अर्वाचीन मराठी ललित साहित्यात प्रथमतः आपले लक्ष कर्णाची व्यक्तिरेखा वेधते. अर्वाचीन मराठी साहित्यात आजपर्यंत सर्वांत अधिक लेखन महाभारतातील कर्णाविषयी झाले आहे. कर्णाचे एवढे जबरदस्त आकर्षण मराठी ललित साहित्यिक आणि विचारवंत यांना का असावे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कर्णावर आधारित साहित्यकृती सर्वांत जास्त असल्यामुळे कर्णाच्या आकर्षणाचा मागोवा येथे घ्यावयाचा आहे. कर्णाविषयीच्या आजपर्यंत उपलब्ध होणाऱ्या सर्व अर्वाचीन कालखंडातील साहित्य कृतींची संख्या पंचवीसपर्यंत भरते. एकटया कर्णाला केंद्र कल्पून या साहित्यकृतींची निर्मिती झाली आहे. या साहित्यात नवोदित, सुप्रतिष्ठित साहित्यिकांच्या साहित्यकृती आहेत. नाटक, कांदबरी, काव्य इत्यादी साहित्यप्रकारही आहेत. महाभारतानुसार कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे पारंपरिक आकलन त्यात आढळते, त्याचबरोबर कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे नवे आकलन, नवे आविष्कारही या साहित्यात आहेत. एकंदरीत 'कर्ण - प्रकरणा'ची ही व्याप्ती लक्षात घेऊन विवेचनाच्या व अभ्यासाच्या सोयीसाठी 'कर्ण: पारंपरिक आकलन' आणि 'कर्ण : नवे आकलन' असे दोन भाग कल्पिले आहेत. कर्णविषयक मराठी ललित साहित्याचा विचार करण्यापूर्वी महाभारतातील कर्णाच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे आवश्यक आहे. महाभारतातील 'कर्ण' :- STT. मराठी ललित साहित्यात कर्णाच्या व्यक्तिरेखेकडे एका धीरोदात्त नायकाच्या भूमिकेतून पाहिले जाते. त्याचे उदात्तीकरण केले जाते, असा आक्षेप महाभारताविषयी परंपरावादी दृष्टिकोन स्वीकारून, अनंतराव आठवले, डॉ. रा. शं. वाळिंबे, सुशीला पाटील, दाजी पणशीकर इत्यादी विचारवंत लेखकांनी घेतला आहे. अर्था यांच्यापेक्षा ललित साहित्यिकांचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, शिवाजी सावंत, बा. सी. मर्ढेकर, रणजित देसाई, वि. वा. शिरवाडकर, मधु भोसले इत्यादी साहित्यिकांचा समावेश होतो. कुंतीला अवगत असलेल्या 'देवाहुती' मंत्रापासून सूर्याला पाचारण करून जन्मलेला कर्ण हा कानीनपुत्र आहे. जन्मत:च त्याला कवच कुंडले होती. कुंतीने त्याला जन्मल्याबरोबर अश्वनदीत सोडले. पुढे अधिरथ व राधा या जोडप्याने त्याचा सांभाळ केला. कर्णा शास्त्रास्त्रविद्येत नैपुण्य संपादन केले होते. परशुरामाकडे ब्रम्हास्त्र, गप्तीसाठी गेलेल्या २ | कर्ण आणि मराठी प्रतिभा