या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
“ चोर मी नाही. तुम्ही सारे चोर आहात. तुमचे मालक चोर आहेत. तुमचा धनी माझी वस्तू चोरून घेऊन आला. ह्या भिकारणीची संपत्ती तुमच्या धन्याने चोरली.”
“ वेडी तर नाहीस ?”
तेथे गर्दी जमली. स्त्रीवर हात कोण टाकणार? हेमा बाहेर आली.
“ काय पाहिजे बाई ?"
" माझी वस्तू."
“ कोणती वस्तू?”
“ माझे चित्र द्या नाहीतर माझे प्राण घ्या. चित्र, माझे चित्र. ते चोर आहेत. त्यांनी ते चोरून आणले.”
“ बाई, रागावू नका, आत या. मला सारे नीट समजून सांगा. या आत."
हेमा त्या भिकारणीला, शिरीषच्या त्या करुणेला आत घेऊन गेली. पहारेकरी पाहातच राहिले !
मी चोर नाही, तुम्ही चोर आहात * ६९