पान:करुणादेवी.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “ कोणी नेले चित्र ? तुम्ही पाहिले का ?” जवळच्या भिकाऱ्यांना तिने विचारले. "

 “ आम्हाला काय माहीत ? आमचे लक्ष तुमच्या चित्राकडे थोडेच होते ? आमचे चित्त समोरच्या फडक्यावर काय पडते त्यावर होते, ” ते म्हणाले.

 “ येथे कोणी आले होते ?”

 “ एक मनुष्य उभा होता. आताच गेला.”

 " कोणत्या दिशेने ? ”

 ती एकदम निघाली. तो चित्र पळवणारा एके ठिकाणी दिव्याजवळ उभा होता. त्या चित्राकडे तो पाहात होता. करुणेचे एकदम लक्ष गेले. त्या माणसाने इकडे पाहिले. तो वेगाने निघाला. करुणेने चोर ओळखला. तीही त्याच्या पाठोपाठ निघाली.

 रस्ते ओलांडीत तो मनुष्य ज्या बाजूला राजवाडे होते, प्रासाद होते तिकडे वळला. जरा अंतरावरून करुणा येत होती. शिरीषचा प्रासाद आला. तो मनुष्य एकदम त्या प्रासादात शिरला. करुणा पाहात होती. किती तरी वेळ त्या प्रासादाकडे पाहात होती. शिरावे का त्या प्रासादात ?

 काही वेळ गेला. इतक्यात राजाकडून रथ आला. शिरीषला बोलावणे आले होते. शिरीष पोषाख करून रथात बसला. धावत जावे व शिरीषला हृदयाशी धरावे, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडावे, असे करुणेला वाटले परंतु पाय जागचा हालेना.

 रथ दृष्टीआड झाला. करुणेने एकदम काही तरी मनात ठरविले. ती त्या प्रासादाकडे वळली. पायच्या चढू लागली.

 “ कोठे जाता आत ?” पहारेकयाने हटकले.

 “ मी भिकारीण आहे.”

 “ भिकारीण का राजवाड्यात शिरते ? हो बाहेर.”

 “ मी आत जाणार.”

  “ हो बाहेरं, दिसतेस बैरागीण, परंतु चोर तर नाहीस ?

" ६४ * करुणा देवी