पान:करुणादेवी.djvu/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 “ हेमा, तुझ्या पित्याने इतकी वर्षे तुला वाढवले, ते का फुकट ? तुझा प्रती तुला कालं परवा मिळाला. त्यांच सुख ते एकंदम तुझं सुख झाले आणि मी ? हेमा, तू नेहमी भेटावीस, दिसावीस म्हणून मी अधीर असतो. तू गेलीस तर मी दु:खी होइन.”

 " बाबा, तुम्हीही चला ना आमच्याबराबर."

 “ हेमा, कर्तव्ये अनेक असतात. कौटुबिक कर्तव्ये तशी सामाजिक. मी जुना मंत्री आहे. एकदम कसा येऊ ? आणि शिरीषनं जाणेही योग्य नाही. राजाने त्याला प्रधान केले, ते का उगीच ? प्रजेचे कल्याण नको का व्हायला ? ज्याच्या ठिकाणी जों गुण आहे ती त्याने समाजासाठी दिला पाहिजे. हेमा, तू गेलीस तर मी दु:खी कष्टी होईन. परंतु मी येथेचं राहीन. मोठे कर्तव्य करीत राहीन. आणि शिरीषविषयी मी महाराजांस विचारणार नाही ! शिरीषला प्रधानकीपासून मुंक्त करा, असे मी कसे सांगू ? हेमा, तू शिरीषची समजूत घाल. म्हणावे वृद्धांना इकडे घेऊन ये, तसे नसेल करता येत तर इलाज नाही. परंतु प्रधानपद सोडून जाण्याचा हट्टकरू नकोस.”

 हेमा दु:खीकष्टी झाली. ती जायला निधाली.

 "आता उशीर झाला आहे हेमा. येथेच नीज. ”

 “ शिरीष वाट पाहील.”

 “ अग, तू का कोठे रानात आहेस ? इतकी काय एकमेकांची वेडी बनलीत ?"

 “ बरे हो बाबा, येथे झोपते.”

 हेमा आज माहेरीच झोपली. परंतु तिला झोप येईना. तिकडे शिरीषही तळमळत होता. “ आईबापांना कसे आणू ? त्यांना आणायचे म्हणजे करुणेला नको का आणायला ? माझे लग्नं झाले आहे ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. का बरे नाही सांगितली ? मी हेमाला फसविले. परंतु तिच्यावर माझे प्रेम आहे. आणि करुणेवर का नाही ? करुणेलाही मी विसरू शकत नाही. हेमा समोर असली, म्हणजे करुणा मनातून दूर होते. परंतु हेमा दूर जाताच करुणा सिंहासन पुन्हा बळकावते. करुणा तिकडे रडत असेल. कोण आहे तिला ? आई ना बाप. किती कोमल,

शिरीष व हेमा * ३१