पान:करुणादेवी.djvu/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रेमळ तिचे मन. परंतु ती कर्तव्य करीत असेल. माझ्या म्हाताऱ्या आईबापांची सेवा करीत असेल.? आणि मी ? काय करावे समजत नाही. ”

 अंथरुणावर शिरीष तळमळत होता. पहाटे त्याला झोप लागली. बाहेर उजाडले. हेमा लवकर उठून घरी आली. परंतु शिरीष झोपलेलाच होता ती शिरीषच्या बिछान्याजवळ उभी होती. पतीचे सुकलेले तोंड पाहून तिला वाईट वाटले. रात्रभर शिरीष तळमळत असेल असे तिने ताडले.

 शिरीषने डोळे उघडले, तो समोर हेमा रडत होती.

 “ ये, हेमा ये. रडू नको.”

 “शिरीष, तू जोपर्यंत दुःखी आहेस, तोपर्यंत मी रडू नको तर काय कृरू ?"

 “ परंत् मी आजपासून हसायचे ठरविले आहे. तुला सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य. आईबाबा तिकड़े सुखात असतील. माझे मित्र त्यांची काळजी घेत असतील. बघतेस काय ? मी खरेच सांगत आहे.”

 “ शिरीष, माझ्यासाठी तुला त्रास”

 “ परंतु तू स्वत:चे सर्वस्व मला दिले आहेस. माझ्यासाठी त् जगदंबेची प्रार्थना करीत असस. तुझ्या प्रेमाचा:उतराई मला होऊ दे."

 “ शिरीष, माझ्या प्रेमाचा तुला का बोजा वाटतो? तुझ्यावर प्रेम केल्यावाचून मला राहावत नाही. त् मला सोडून गेलास, तरीही मी तुझ्यावर प्रेम करीन. माझे प्रेम मोबदल्याची अपेक्षा नाही करणार. शिरीष, माझ्या प्रेमाची फुले वाहायला तुझी मूर्ती मिळाली. मी कृतार्थ झाले.”

 “ उठू आता !”

 “ झोप येत असेल तर पडून राहा.”

 “ प्रजेची सेवा करणायाने निजता कामा नये. त्याने रात्रदिवस जागृत राहिले पाहिजे. उठू दे मला.”

 शिरीष उठला. आज तो उल्हसित होता. दुपारी कचेरीत गेला. शिरीषचे मुखकमल प्रसन्न पाहून आदित्यनारायणास आनंद झाला.

 “ शिरीष, बरे आहे ना ?”

 “ आनंद आहे. आजपासून मी प्रजेच्या कामात सव शक्ति ओतणार आहे."

३२ * करुणा देवी