पान:करुणादेवी.djvu/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 “ काळजी नको करू.” लोक म्हणाले.

 आईबापांच्या पाया पडून व करुणेचा आणि प्रेमानंदाचा निरोप घेऊन शिरीष निघाला. तो घोड्यावर बसला. गेले घोड़े. शिरीष मागे वळून पाहात होता. गेले घोडे. वाऱ्यासारखे गेले. लोक आपापल्या घरी गेले. सुखदेव व सावित्री घरात आली. करुणा घरात आली. ती रडत होती.

 “ करुणे, रडू नकोस.” प्रेमानंद म्हणाला.

 “ मी एकंदरीत दुर्दैवीच आहे !” ती म्हणाली.

 “ करुणे, अशुभ मनात आणू नये.” तो म्हणाला.

 “ परंतु येते त्याला काय करू ?” ती म्हणाली.

 “ कर्तव्य करणे एवढे आपले काम.” असे म्हणून प्रेमानंद निघून गेला.करुणादेवी.djvu

शिरीषचे प्रयाण * १९