जबाबदार धरणार. मी म्हटलं, पण मी सही केली नसती असं वाटलं तरी कसं तुम्हाला? तर म्हणतो, कुणाचं काय सांगावं?'
हे सांगतानाही चारूला इतका राग आला होता की त्याच्या कपाळावरच्या शिरा थाडथाड उडत होत्या.
विभा म्हणाली, 'जाऊ दे, चारू, सोडून दे. काही माणसं असतात अशी.'
रात्री चारू नीट जेवला नाही आणि कितीतरी वेळ येरझारा घालीत होता. तो अजून ऑफिसमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल उद्विग्न आहे असं कळल्यावर विभाला जरा आश्चर्य वाटलं. ती तो प्रकार विसरून गेली होती. शेवटी तिनं त्याला बळेच झोपायला लावलं. ती म्हणाली, 'चारू, इतक्या क्षुल्लक गोष्टीबद्दल किती मन:स्ताप करून घेशील?'
'गोष्ट क्षुल्लक असेल, पण त्यामागची वृत्ती केवळ माझी अडवणूक करण्याची आहे.'
तिच्या मिठीत त्याचं अंग ताठरलेलं तिला जाणवलं. ती म्हणाली, 'आता त्याबद्दल बोलू नको, विचारसुद्धा नको.'
मग सवयीनं माहीत झालेल्या त्याच्या शरीराच्या संवेदनाक्षम भागांवर आपल्या हळूवार बोटांनी किमया करीत करीत तिनं त्याला सैलावलं. एक सुस्कारा सोडून तिच्याभोवती हात लपेटून तो झोपल्यावर कितीतरी वेळ ती छताकडे बघत स्वतःच्या भुतांशी झगडत होती.
पुढं ही नित्याचीच गोष्ट झाली. कुठं टूरवर जाताना घेतलल्या ॲडव्हान्सचा हिशेब लवकर दिला गेला नाही म्हणून त्याला फैलावर घेतलं गेलं होतं, पुन्हा असं झालं तर ॲडव्हान्सची सबंध रक्कम त्याच्या पुढच्या पगारातून कापून घेतली जाईल अशी वॉर्निंग देण्यात आली होती.
विभा समजुतीच्या स्वरात म्हणाली, 'अरे पण तूच ना मला सांगितलंस सगळेजण कसे ॲडव्हान्स घेऊन त्याचा हिशेब देत नाहीत आणि त्याबद्दल सदा ओरड चालू असते?'
हो, पण इतरांना आणि मॅनेजरच्या लेव्हलच्या माणसाला एकाच फूटपट्टीनं माजून चालेल? उद्या एम. डी. ला हिशेब मागतील की!'
तक्रारी वाढायला लागल्या. प्रत्येक बंद दारामागे आपल्याविरूद्ध कट शिजतोय असं चारूला वाटायला लागलं. कळस झाला त्याच्यानंतर लागलेल्या ज्युनियर माणसाला वर बढती दिली त्या दिवशी.
तुला वाटतं मी विनाकारण चिरचिर करतो. पण हा माझा धडधडीत
पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/85
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कमळाची पानं । ८५