पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे त्याला हे करण्याचा?
 वसू माझ्यासमोर बसली होती. हडकुळ्या गुडघ्यावर कोपर अन तळव्यावर हनुवटी टेकून. फार वेळ स्वस्थ बसल्यामुळे चुळबूळ करायला लागली होती. मी उठले रे उठले की ती गलोलीतून सुटलेल्या गोट्यासारखी उताराला लागणार होती. पण पुन्हा इथंच येणार होती. वीसपंचवीस वर्षांनी, पाय ओढत, धापा टाकीत.
 तिच्या आजच्या स्वच्छ चेहऱ्यात मला वेदनेनं गढूळलेले डोळे दिसले.
 रागाच्या झटक्यात मी उठले न म्हटलं, "चला, निघू या परत जायला."


पूर्व प्रसिध्दि :
सत्यकथा सप्टेंबर १९७७