पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ रें. ] होते. जरासंधानें सर्व मथुरेस वेढा घातला व आंतील लोकांना त्राही नाही करून -सोडलें. तेव्हां श्रीकृष्णही आपल्या सैन्यासह जरासंधाशी युद्ध करूं लागला. अध्याय २ रा. या भयंकर युद्धामुळे मथुरेच्या लोकांचं फार नुकसान होऊं लागलें. कोणाच घरे, कोणाचे वाडे, कोणाची मंदिरें ही धडाडून पडूं लागली, लोक मरूं लागले, तेव्हां या अनर्थाबद्दल नगरवासीजन कृष्णास दोप देऊं लागले. लोकांची ही परिस्थिति पाहतांच कृष्ण व बलराम यांस त्वेष चढला. कृष्णाने आपल्या मुदर्शन चक्राच्या योगानें जरासंधाचे हजारों वीर कापून काढले. बलरामानें जरासंधावर मोर्चा केला. बलराम व जरासंध हे दोघेही महापराक्रमी होते. दोघांना नऊ सहस्र नागांचें वळ होतें. त्या दोघांचें युद्ध होतांच पृथ्वीचा प्रळयकाळ समीप आला की काय असे लोकांना वाटू लागले. बलरामानें आपले मुसळ वर उचलले व तें तो आतां जरासंधाच्या मस्तकावर घालणार तोंच आकाशांतून देववाणी झाली की, हे बलरामा ! ते मुसळ तूं परत घे. तुझ्या हातून जरासंधास मृत्यु नाहीं. ही आकाशवाणी ऐकल्यावर बलरामाने आपलं मुसळ परत घेतले व जरासंधाला वरुणपाशानें बांधून टाकले. इकडे श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्रानें सर्व सैन्याचा विध्वंस केल्यामुळे जरामधाचे वीर गतधैर्य झाले. मग श्रीकृष्णांने जरासंधाचे वरुणपाश तोडून टाकले व त्यास मोकळा करून मोठ्या सन्मानाने त्याच्या नगरास पाटवून दिले. कांही दिवस गेल्यावर जरासंधाने पुन्हां सैन्याची तयारी केली व तो मथुरेवर चालून आला. त्या वेळींही श्रीकृष्णानें व बलरामाने त्याला न मारितां जिवंत सोडून दिले. याप्रमाणे जरासंधानें सत्रा वेळां मथुरेवर स्वान्या केल्या, पण तितक्याही वेळां श्रीकृष्णाने त्याचा पराभव करून त्याला जिवंत सोडून दिले. मथुरेस जरासंधाचा सत्रा वेळां पराभव झाल्यानें तो फारच संतप्त झाला, त्यानें देशोदेशीचे श्रीकृष्णाचे अनेक शत्रु एकत्र केले व मोठ्या तयारीनें त्यानें पुन्हा मथुरेवर हल्ला केला. त्या वेळी बलराम म्हणाला, कृष्णा, या जरा- संघाला सत्रा वेळां आपण जिवंत सोडलं, तरी तो आपला द्वेष टाकीत नाही. सर्पास जिवंत सोडल्याचे जसे उपकार वाटत नाहींत, तसाच हा जरासंध कृतघ्न आहे; ! तेव्हां या प्रसंगी त्याजवर दया करणे वाजवी नाहीं.” श्रीकृष्णास बल- रामाचें तें म्हणणं पसंत पडलें व ते दोघेही युद्धासाठी निघाले; इतक्यांत मथुरे- तील विकद्रू नावाचा एक थोर गृहस्थ रामकृष्णांना भेटून म्हणाला, " देवहो ! हा तुमचा युद्धपराक्रम आतां पुरे झाला. त्या जरासंधानें मथुरेवर सत्रा वेळां हल्ले करून साऱ्या मथुरेची धूळधाण करून टाकली. मथुरेतले अनेक लोक निष्कारण मृत्युमुखी पडले व हजारों मंदिरें नाहींशी झाली. तुम्ही दोघांनी केला. तुम्हीं त्या कंसाला मारले नसतें, तर मथुरेची अशी दुर्दशा कशाला झाली असती ? रामकृष्णहो ! आतां या वेळी तरी युद्ध करूं हा सर्व अनर्थ