पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक नका, म्हणजे या मथुरेच्या लोकांवर उपकार होतील. हैं विकद्रचें भाषण ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, " आम्हांपासून जर मथुरेला एवढा उपद्रव होत असेल तर आम्ही मथुरा सोडून दुसरे ठिकाणीं जातों; तुम्हीं आपला गांव खुशाल सांभाळावा. " असे म्हणून ते दोघेही मथुरेहून निघाले ते कोल्हापुरा- नजीक कन्हऱ्हाडास आले. तेथे त्यांची व परशुरामाची भेट झाली. कहऱ्हाडा- जवळ एका वटवृक्षाखाली परशुराम रहात असत; जवळ कामधेनु व धनुष्य- वाण असल्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीचं उणें नव्हतें. एकमेकांनी एक- मेकांचें क्षेमकुशल विचारल्यावर भार्गवराम म्हणाले; कडे येणें केलें ? " तेव्हां श्रीकृष्ण म्हणाला, कृष्णा ! इकडे कोणी- " रामा ! जरासंधानें सर्व मथुरा- 99 23 नगरी पादाक्रांत केली आहे, तेव्हां निरुपाय जाणून नगर सोडलें, व या अरण्यांत तुझ्या आश्रयाला आलो आहोत. हें कृष्णाचें विनोदाचें बोलणें ऐकून परशुरामाला हंसूं आलें. ते ह्मणाले, " हे श्रीकृष्णा ! संपूर्ण जग त्रयाला तुझा आश्रय असून आमच्या आश्रयाची तुला काय आवश्यकता आहे ? तुझें सामर्थ्य मला माहीत आहे. त्या जरासंधाचा तुला धाक तो किती ? तूं मनांत आणशील तेव्हां त्याला नाहींसें करूं शकशील तुझे गूढ चरित्र कोणालाही उकलणार नाहीं. असो. अशा निमित्ताने का होईना तुह्मां उभयतांची भेट झाली हैं फार चांगलं झालें. कन्हऱ्हाड हे तुमचेंच गांव आहे, असे असून येथें मृगाळ व वासुदेव तुमचा वेष धारण करून राज्य करीत आहे. कपटप्रयोगानें तो चतुर्भुज झाला आहे. तरी त्या दोघांचा नाश करून त्याच्या पुत्राला गादीवर बसवा, आणि मग जा. तसेच हा गोमाचल पर्वत फार उंच वाढला असून सूर्याच्या रथाला वारंवार अडथळा करितो; करितां यालाही भूमीगत करावें. " याप्रमाणे भार्गवरामानें श्रीकृष्णास सांगितले. नंतर कामधेनुकडून उत्तम भोजनाची तयारी करवून त्यांस सत्का- रानें भोजन घातले. नंतर भार्गवराम तेथून निघून वैतरणामुखाजवळ समु- द्राचे कांठी येऊन राहिले. भार्गवरामांनी सांगितल्याप्रमाणं श्रीकृष्णाने गावांत प्रवेश करून त्या तोतया कृष्णाला, राज्य सोडण्याविषयी व खोट्या भुजा कापून टाकण्या- विषयी सांगितलें, परंतु तो तोतया अभिमानानें अंध झाला असल्यामुळे श्री- कृष्णाचें ह्मणणे त्यास पसंत पडले नाही. त्यानें कृष्णाचा धिक्कार करून युद्धाची तयारी केली. तेव्हां बलरामकृष्णानी त्याचा विध्वंस केला. अशा रीतीनें मृगालाची व्यवस्था लागल्यावर त्याची स्त्री आपल्या मुलाला श्रीकृ ग्णाकडे घेऊन आली, व त्याला श्रीकृष्णाच्या पायांवर घालून ह्मणाली, “ हे देवाधिदेवा ! माझ्या पतीला त्याच्या अपराधाचें योग्य असे प्रायश्चित्त मिळाले. पण आतां या पोरावर दया करावी. है राज्य व ऐश्वर्व सर्व आप- ●