पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरु. [ स्तबक उग्रसेनाची स्त्री त्याचे बरोबर सर्व व्यवहार करूं लागली. या कपट वेषधारी उग्रसेनापासून त्या पतिव्रतेला जो मुलगा झाला तोच हा कंस होय. या 'दमील' राक्षसाची पापवासना पुरी झाल्यावर त्याने आपले पूर्व रूप उग्रसेनाचें स्त्रीस दाखविलें. तेव्हां उग्रसेनाची स्त्री आपल्या पातिव्रत्याचा त्या कपटी दानवाने भंग केला झणून आत्महत्या करूं लागली. तेव्हां दमिल ह्मणाला; " हे स्त्रिये ! तूं पतिव्रताच आहेस; कारण, मी तुला तुझ्या पतिस्वरूपानेंच फसविलें आहे." अर्से त्या दैत्याचें भाषण ऐकून उग्रसेनाचे स्त्रीने आत्महत्या केली नाही, पण तुझ्या वंशाचा ईश्वर निःपात करील असा त्याला शाप दिला. त्या शापाप्रमाणे कंसाचा श्रीकृष्णांनी वध करून त्याचा निवेश केला. २ गुरुदक्षिणा. श्रीकृष्णानें, कंसाचा वध केला त्यावेळी, भगवान् फारच लहान होता. त्यानंतर आठवे वर्षी कृष्णाचा व बलरामाचा व्रतबंध करून त्या दोघांना त्यांच्या आईबापांनी संदीपन ऋषीजवळ विद्याभ्यासासाठी ठेविलें होतें. तेथेंच श्रीकृष्णाची व सुदामाची ओळख झाली. तो मुदामा पुढे कृष्णाचा मोठा सखा झाला. तिघेही गुरुगृहीं एको- प्यानें राहून विद्याभ्यास करीत असत. कांही दिवस गेल्यावर सर्वांचा विद्याभ्यास झाला. तेव्हां श्रीकृष्णांनें गुरूस वंदन करून, “इच्छा असेल ती गुरुदक्षणा मागावी” झणून विनंति केली. संदीपन ऋषीला श्रीकृष्णाची अतर्क्स शक्ति माहीत होती. तो ह्मणाला, “ कृष्णा ! प्रभास नांवाच्या पुण्यक्षेत्री, समुद्रांत पोहण्यासाठी माझा मुलगा गेला असतांना, त्याला जलचरांनी एकाएकी पाण्यांत ओढून नेले आहे. तेव्हां मला जर कांहीं गुरुदक्षिणा द्यावयाची असेल, तर तेवढा माझा मुलगा मला परत आणून दे. " मग श्रीकृष्ण गुरूला आश्वासन देऊन तेथून प्रभासक्षेत्रीं आला. व सागराची विनंति करून, संदीपनपुत्र परत द्या " ह्मणून त्यानें सागराजवळ मागणें केले. तेव्हां सागर ह्मणाला, कृष्णा ! पांचजन्य नांवाचा शंख आहे, त्याने संदीपनाच्या मुलाला नेले आहे. तर त्याच्याकडे जाऊन तूं मुलगा माग. " सागराने असं सांगितल्यावर श्रीकृष्णांनें समुद्रांत उडी मारली व पांचजन्य शंख शोधून काढला, पण त्याच्याजवळ पुत्र नसून तो यमलोकीं आहे असे कळलें. मग श्रीकृष्ण यमाकडे गेला, व त्याच्याजवळून संदीपनाचा पुत्र मागून घेऊन तो गुरूला नेऊन दिला. याप्रमाणे गुरुदक्षिणा दिल्यावर श्रीकृष्ण मथुरेस बलरामासह परत आला. इकडे कंसाच्या स्त्रिया आपला बाप जो जरासंध याच्याकडे येऊन श्रीकृष्णाचा सूड घेण्याविषयी त्याची विनवणी करीत होत्या. तेव्हां आपल्या कन्येच्या इच्छेप्रमाणें तेवीस अक्षौहिणी सैन्य 66 आपणाबरोबर घेऊन मथुरेवर आला, त्याच्या सैन्यांत शाल्व, दमघोष, पौंडूक, चासुदेव, महामद, एकलव्य, दंतवक्र, विदूर वगैरे अनेक मोठमोठे योद्धे