पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२.] अध्याय २ रा. अध्याय २ रा. ८९ १ श्रीकृष्ण - जरासंध कथा. वैशंपायन ऋषि व राजा जनमेजय या उभयतांचा कथोपकथन प्रसंग चालला असतां एके दिवशीं जनमेजय राजानें वैशंपायन ऋषीला असा प्रश्न केला कीं, " एवढी सप्तद्वीप पृथ्वी असून, त्यांपकी कोणतेंच स्थान श्रीकृष्णाला कां पसंत पडले नाहीं ? त्यांनी द्वारकेची स्थापना कां केली ? व ते तेथें सर्व यादवांसह कां राहूं लागले ? ” जनमेजय राजाचा हा प्रश्न ऐकून वैशंपायन ऋषी ह्मणाले; " हे राजा जनमेजया ! पूर्वी जरासंध या नांवाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस- राजा होऊन गेला. त्यानें श्रीकृष्णाचा सूड उगविण्यासाठी कृष्णाच्या मथुरा नगरीवर सत्रा वेळ हल्ले केले. त्यामुळे मथुरानगरींतील लोकांचे फार नुकसान झाले व ते अगदीं त्रस्त होऊन गेले. जरासंधाचा नाश करावा तर तसे करण्यासही कांहीं अडचणी होत्या, तेव्हां श्रीकृष्णांनी ज्या समुद्रांत जरासंधाचा प्रवेश होणार नाहीं, अशा ठिकाणी द्वारका नांवाची नगरी एका रात्रीत निर्माण करून तेथे सर्व यादवांनां नेऊन ठेविलें व आपणही द्वारकेंतच राहूं लागले. " वैशंपायन ऋषीचें हैं संक्षिप्त उत्तर ऐकून जनमेजय राजाला ती कथा संपूर्ण ऐकण्याची इच्छा झाली. तो ह्मणाला, वैशंपायन महाराज ! कृपा करून ती सर्व कथा आपण मला सांगावी.” राजाच्या विनंतीस मान देऊन वैशंपायन ऋषि, ती कथा सांगू लागला. तो ह्मणाला, " जरासंधाचा जांवई जो कंस, त्या कंसाचा श्रीकृष्णानें नाश केल्यामुळे श्रीकृष्ण व जरासंध या दोघांमध्यें वैर उत्पन्न झालें होतें. जरासंधाला दोन मुली होत्या व त्यांजवर त्याचें फार प्रेम होतें. त्या दोन्ही मुली त्यानें कंसाची कीर्ति व वैभव पाहून त्याला दिल्या होत्या. आपल्या मुलींस कृष्णानें वैधव्यपंकांत लोटून दिल्यामुळे जरासंध कृष्णावर अत्यंत संतप्त झाला, व त्याचा सूड उगविण्याकरितां मथुरेवर सत्रा वेळ हल्ले केले. १

याप्रमाणे वैशंपायन ऋषि कथा सांगत असतांना जनमेजय राजा मध्येच ह्मणाला; "ऋषि! कंस हा कृष्णाचा सख्खा मामा होता. शिवाय श्रीकृष्ण भगवान् झणजे सर्व कांहीं जाणते. असे असतांना त्यांनी आपल्या हातांनी आपल्या मामाचा वध कां केला, हैं मोठें गूढ आहे. तर माझी शंका दूर करावी. तेव्हां वैशंपायन ह्मणाला; राजा ! कंस हा उग्रसेनाचा मुलगा खरा, परंतु कंसाची उत्पत्ति दैत्त्यापासून झालेली आहे. उग्रसेन राजा एके दिवशीं शिकारीसाठी गेला असतां त्याच्या पश्चात् ' दमिल ' नांवाचा राक्षस उग्रसेनाच्या मंदिरांत उग्रसेनाचें रूप धारण करून गेला. त्यास आपला पती समजून 66