पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लें. ] अध्याय १५ वा. वा- मनूने ती इच्छा पुरी करण्याविषयी सरस्वतीजवळ मागणी केली. सरस्वतीने ती गोष्ट अमान्य केली. तेव्हां वैवस्वत कामातुर होऊन तिजवर बलात्कार करूं. लागला. मग, सरस्वतीने मृत्तिकेच्या गायींत प्रवेश केला, तेव्हां वैवस्वताने मृत्तिकेच्या बैलांत प्रवेश करून तिच्याशी संभोग केला, त्यानंतर सरस्वती बकरीच्या शरीरांत शिरली, वैवस्वत चकन्याच्या शरीरांत शिरला. प्रमाणं सरस्वती अनेक प्राण्यांच्या शरीरांत शिरली, व वैवस्वतह त्या प्राण्यांच्या शरीरांत प्रवेश करून संभोग करूं लागला. पुढे या सर्व प्राण्यांना संतति होऊ लागली. जरा, मरण वगैरे प्रकारहि त्यांना भोगणें भाग झालें. अशा रीतीनें सृष्टि निर्माण झाल्यावर व्यासानें वर्णाश्रमधर्माची वगैरे स्थापना करून, या जड़ सृष्टीस मुव्यवस्थित स्वरूप आणलें. ही कथा उपनिषदांत आहे, ती मी तुला सांगितली; याशिवाय या प्रळयाविषयी व उत्पत्तीविषयी अनेक ग्रंथांची अनेक मतें आहेत. त्याविषयीं कितीही सांगितले, तरी थोडेंच आहे." याप्रमाणं वैशंषा- यन ऋषींनी जयमेजय राजाला ही कथा सांगितली आहे. प्रथम स्तबक संपूर्ण. झणून तुला सांगितलें कोणी? त्या ज्ञानवृक्षाचें फळ तूं खाल्ले नाहींसना ! ' अॅडमनें व ईवनें देवास घडलेली सबै हकीकत सांगितली. तेव्हां देव संतापला, व अॅडम, ईव व सर्प या तिघांसही भयंकर शाप दिले. व नाना तऱ्हेची दुःखें, संकटें व त्रास यांचे त्यांस धनी केलें. ज्ञानवृक्षाची फळे खाऊन हीं माणसे आपणाप्रमाणें ज्ञानी झाली, आतां जर त्यांस या बागेत राहूं दिले तर कदाचित् 'जीवनवृक्षाची' फळे खाऊन ती अमर होतील, अशी भीति देवास पडल्यामुळे त्याने त्यांस बागेतून कायमचे हांकलून दिलें,