पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक स्वर्ग झाला. असून त्याच्या खालच्या भागाचें पाताळ झालें, वरील भागाचा आणि मधले भागाची पृथ्वी झाली; असे उपनिषदांत सांगितलेले आहे. तसेच उपनिषदांत असेंही सांगितले आहे की, कश्यपास तेरा स्त्रिया होत्या. या तेरा स्त्रियांपासून निरनिराळे प्राणीमात्र उत्पन्न झाले. मनुरचना यापेक्षां निराळी आहे, सांप्रत वैवस्वत मनु असून या मन्ने प्रथम आदिशक्ति उत्पन्न केली व या शक्तीपासून पुढे ब्रह्मदेवानें सरस्वती निर्माण केली, मनु व सरस्वती या दोघांनीं स्वतःच्या करमणुकीसाठी, चिखलाचीं अनेक चित्रे निर्माण केलीं, व धान्य उत्पन्न केले. तें धान्य* खाल्यावर दोघांनाही कामवासना उत्पन्न झाली, व कथाकल्पतरु.

  • बायबलमध्यें सृष्टोत्पत्तीविषयी काही अंशी अशीच कथा आहे. ती येथे मुद्दाम

दिली आहे. पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे इत्यादि जड विश्व व त्यामधील यच्चयावत सजीव सृष्टि एकामागून एक सहा दिवसांत परमेश्वरानें निर्माण केली. व सातव्या दिवशी त्यानें `विसावा घेतला. या सृष्टीचा उपभोग करून त्यावर स्वामित्व चालविण्याकरितां परमे- श्ररानें आमानुरूप असा एक पुरुष मृत्तिकेपासून उत्पन्न करून त्यास अॅडम असे नांव दिले. नंतर त्याने अॅडमकरितां सुंदर फलपुष्पांनी युक्त असं एक उपवन तयार केलें, व या उपवनांत 'जीवनवृक्ष' व 'ज्ञानवृक्ष' असे दोन वृक्ष रोविले. अॅडमची स्थापना या उद्यानांत करितांनां परमेश्वराने त्यास बजावून सांगितले की, ज्ञानवृक्षाचें फळ ज्यावेळी तूं भक्षण करशील, यावेळी तुला मरण प्राप्त होईल. मग अँडमवर परमेश्वरानें निद्रास्त्र सोडिलें, व तो निजला असतां त्याची एक बरगडी काढून तिज पासून 'ईव' नांवाची एक स्त्री निर्माण केली, व ती त्यास अर्पण केली. अॅडम आणि ईव जन्मतः नग्न होती, व ती तशीच नांदूं लागली. परमेश्वराने निर्मिलेल्या प्राण्यांत सर्प फार धूर्त होता. त्यानें ईवला मोह पाडला, व तिचा बुद्धिभेद केला. ज्ञानवृक्षाचे फळ चाखिल्याने मृत्यु येईल ही भीति नको. कारण, ते फळ खाणाऱ्या मनुष्यास पापपुण्याचें ज्ञान होऊन तो देवतुल्य होईल; ह्मणून परमेश्वरानें ही उगीच धमकी दिली आहे. हा सर्पाचा बुद्धिवाद ईवला खरा वाटला. तिने ज्ञानवृक्षाचें सुंदर व मधुर फळ स्वतः खा व अॅडमलाहि दिले. फळ खातांच त्यांचे डोळे उघडले व आपण नम्र आहोत हे ज्ञान त्यांस झाले. नंतर त्यांनी अंजिराची पाने एकत्र शित्रून वस्त्रे बनविली. इतक्यांत नित्यक्रमाप्रमाणे परमेश्वर त्यांच्याशी भाषण करण्याकरितां येत असतां त्याचा आवाज ऐकून अॅडम व ईव झाडांमध्ये लपली. परमेश्वराने हांक मारून 'तूं आहेस तरी कोठे?' असा प्रश्न करितांच अॅडमनें उत्तर दिले की, 'तुझा आवाज मी ऐकला पण मी नागवा असल्यानें लपून राहिलों, परमेश्वर ह्मणाला, 'पण तूं नागवा आहेस 6