पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १५ वा. कृपा करून सांग?” मग ते लहान मूल ह्मणालें. "बाळा! मला मुकुंद असे ह्मणतात. या सर्व त्रिभुवनाचा कर्ता, हर्ता मीच कायतो एक आहे. प्रळय काळची कथा सर्वांना कळावी ह्मणून हिचा तूं प्रसार कर" याप्रमाणे मार्केडेय ऋषीस सांगि तल्यावर बालमुकुंदाची मूर्ति अदृश्य झाली. २ विश्व उत्पत्ति. हे जनमेजया ! तुला प्रळयाची माहिती सांगितली, आतां उत्पत्तीविषयीं कांहीं माहिती सांगतों. श्रीविष्णूंनी आपल्या नाभीकमळापासून एक कमल उत्पन्न केळे. या कमलांत ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांना चार मुखें असून त्यांनी चार वेद निर्माण केले. पुढें विष्णूच्या कानांतील मलापासून मधु व कैटभ, असे दोन राक्षस उत्पन्न झाले, हे राक्षस फार उन्मत्तं झाल्यावर ब्रह्मदेवाकडे जाऊन त्याला आमच्याबरोबर युद्ध कर, हाणून ह्मणूं लागले. परंतु ब्रह्मदेव त्यांच्याबरो- वर युद्ध करण्यास कबूल झाला नाहीं. ब्रह्मदेव त्यांनां ह्मणाला; “राक्षसहो ! युद्ध- विद्या तर मला स्वप्नांतही माहित नाहीं; तेव्हां मजबरोबर युद्ध करून उपयोग काय ? क्षीरसागरी शेपशाई नारायण निद्रिस्थ आहेत, त्यांच्याकडे तुझीं जा हणजे तुमची मनोवांछा ते पुरी करितील. " ब्रह्मदेवांनी असे सांगितल्यावर ते दोघेही विष्णूकडे येऊन त्यास युद्धाला ये, असे ह्मणूं लागले. विष्णूने त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर पुष्कळ वेळ युद्ध केले, परंतु ते दोघेही राक्षस विष्णूला आटोपेनात मग विष्णु त्या दोघांना ह्मणाले, " हे दैत्यहो! मी तुमची युद्धविद्या पाहून प्रसन्न झाली आहे, तर कांहीं वरदान मागणे असल्यास मागून घ्या.” त्या राक्षसांना विष्णूचें हैं ह्मणणे रुचलें नाहीं. ते दोवेहि ह्मणाले, तुजसारख्या कृपणाजवळ काय मागवयाचें आहे ? तूंच पाहिजे तर आमच्याजवळ कांहीं माग, आह्मी तें तुला द्यावयाला तयार आहों." तेव्हां विष्णु ह्मणाले, "तुझी दोघेहि आपले प्राण महा द्या." विष्णूचे मागणे ऐकून राक्षस ह्मणाले, " जेथे पाणी नाहीं व जेथें कोणास मरण नाहीं, अशा ठिकाणी आमचा वध कर. मग विष्णूनें त्या दोबांना आपल्या मांडीवर मारलें. या दोन राक्षसांच्या मेदापासून पृथ्वी उत्पन्न झाली. ह्मणून पृथ्वीला मेदिनी असें ह्मणतात, याप्रमाणें पृथ्वी उत्पन्न झाल्यावर ब्रह्मदेवानें अनेक प्राणीमात्र व वस्तु वनस्पति, निर्माण केल्या. अशाप्रकारें पृथ्वी उत्पन्न झाली, असें हरिवंश ग्रंथांत आहे. विष्णुपुराणाच्या मतें पृथ्वीची उत्पत्ति हिरण्यगर्भापासून झाली असें आहे. हिरण्यगर्भ हा अंड्याच्या आकारासारखा 66 "