पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ कथाकल्पतरु. [ स्तबक नंतर मुसळधार पाऊस पडून, सर्वत्र स्वर्ग - मृत्यु - पाताळांत पाणीच पाणी होऊन जातें या उदकांत क्षीरसमुद्रामध्यें भगवान् विष्णु सहस्रमुखी शेषाच्या शय्येवर निद्रिस्थ असतात. क्षीरसमुद्र ही भगवंताची राजधानी होय. तेथें ते सहस्रावधि युगे योगमायेसह आहेत. १ महाप्रळयाचं वेळी सर्व जलमय झालेले असतांना, मार्कडेय ऋषि, पाण्यावर इतस्तत: संचार करीत फिरत होते. मार्केडेय ऋषि चिरंजीव असल्यामुळे त्यानां त्या भयंकर प्रसंगाची भीति वाटत नव्हती, पण सृष्टीचें तें चमत्कारिक स्वरूप पाहून त्यांच्या मनाला फार उदासीनता उत्पन्न झाली. मनुष्य किंवा दुसरा कोणताहि प्राणि त्यांच्या दृष्टीस ह्मणून पडेना. अशा कष्ट- कारक स्थितीत सांपडल्यावर मार्कंडेय ऋपीनी परमेश्वराची प्रार्थना केली, की, " हे आदिपुरुपा ! जगन्निवासा ! अनंता ! हे देवाधिदेवा ! या अशा भयाण सृष्टीत मी एकटा काय करूं ? मला ही स्थिति मुळांच बरी वाटत नाही. हे केशवा ! मला एकवार तुझें दर्शन तरी घडू दे." याप्रमाणें देवाची स्तुति करीत करीत मार्कंडेय ऋषि एका वटवृक्षाजवळ आले. तो वटवृक्षहि पाण्यांत बहुतेक बुडून गेला असून त्याच्या कांहीं शाखा मात्र पाण्यावर होत्या. त्या झाडाला एक मूळ, तीन शाखा व सहा फांटे होते आणि अठरा पारंब्या होत्या. पानें तर अनंत होती. पाण्याला लागून असलेल्या एका पानावर एक बालमूर्ति होती, ते लहान मूल त्या पानावर आनंदाने खेळत असून आपल्या पायाचा आंगठा चोखित होते. मार्केडेय ऋषि, त्या वटवृक्षाजवळ आल्यावर तें मूल हाणालें. 6 बाळा, माकंडेया ! कुशल आहेसना ?" त्या मुलाचा हा प्रश्न ऐकून मार्केडेयास मोठें आश्चर्य वाटलं. वडाच्या पानावर आंगठा चोखीत असलेल्या एका लहान मुलाने आपणास बाळ' ह्मणावं, याबद्दल त्याला राग आला व तो त्या मुलाला झणाला, “अरे एकवीस कल्पांचें माझें आयुष्य आहे. असे असून तूं मला बाळ ह्मणतोस ? हा प्रळयकाळ मी प्रत्यक्ष पाहिला, तरी तूं मला पोर समजतोस ? मोढे आश्चर्य आहे हाणावायचें ! " ऋषीचं हे बोलणें ऐकून, वटपत्रावरील मूल खदखदां हांसून ह्मणालें, बाळा मार्केडेया ! मला तूं लहानच आहेस. अशी कित्येक कल्पे व महाप्रळय मी पाहिली आहेत. तुझे बापानें माझी भक्ति करून, मला चिरंजीव पुत्र व्हावा असा वर मिळविलेला आहे. ह्मणून तूं चिरंजीव झाला आहेस " नंतर मार्केडेय ऋषि ह्मणाला; "हे बालका ! या प्रलयकाळामुळे मी अत्यंत १. भयभीत झाल्यामुळे मला तूं कोण आहेस याची ओळख पटत नाहीं. तरी तेवढे ८८ १