पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १५ वा. ८३ तशीच महाप्रळय काळची माहिती आपणांकडून ऐकावी, अशी माझी इच्छा आहे; '„ जनमेजयाचें हें भाषण ऐकून वैशंपायन ह्मणाला, " राजा ! यासंबं धानेंहि मी तुझें समाधान करितों; तथापि ती कथा मला संपूर्ण अशी अवगत नसल्यामुळे तुझे चांगल्या रीतीनें समाधान करितां येईल किंवा नाही याची मला शंका आहे. महाप्रळयाचा अनुभव घेऊन ती कथा लिहिणारा किंवा सांगणारा या अखिल त्रिभुवनांत कोणीहि नाहीं. फक्त एक मार्केडेय ऋषि मात्र आहेत, त्यांच्या आयुष्यक्रमांत हा महाप्रळय एकदां झाला होता; पुढे त्यांनी त्या महाप्रळयाची हकीकत ब्रह्मदेवाला सांगितली, ब्रह्मदेवांने ती व्यासांना सांगितली होती, आणि व्यासांनी मला सांगितली आहे. व्यासांनी जी हकीकत मला सांगितली आहे, ती आतां मी तुला सांगतो. युगे चार आहेत, त्यांची नांवें कृत, त्रेता, द्वापार आणि कलो अशी आहेत. कृतयुगाची वर्षसंख्या सत्रा लक्ष अठ्ठावीस हजार आहे. त्रेता युगाची वर्षसंख्या, बारा लक्ष शहाण्णच हजार आहे. द्वापाराची वर्षसंख्या, आठ लक्ष चौसष्ट हजार आहे; आणि कलियुगाची वर्षसंख्या, चारलक्ष बत्तीस हजार आहे. या चार युगांची सर्व वर्षे लोटलीं ह्मणजे एक देवयुग होतें; आणि अशी एकाहत्तर देवयुगे झाली ह्मणजे एक मन्वंतर होते. मनुष्याचें एक वर्ष, तो देवांचा एक दिवस होय; आणि अठ्ठावीस मन्वंतरं गेली ह्मणजे ब्रह्म- देवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला ह्मणजे ब्रह्मांडप्रळय होतो आणि अशा रीतीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे झाली ह्मणजे महाप्रळय होतो. कृतयुगाचे वेळीं, चौपट धर्म व एकपट पाप अशी स्थिति होती; त्रेतायुगांत तीन भाग धर्म व दोन भाग पाप, अशी स्थिति होती; द्वापारांत धर्म व पाप हीं समसमान होती आणि कलियुगांत चौपट पाप व एकपट धर्म अशी अवस्था आहे. पाप हे अत्यंत वाढल्यावर धर्म निद्रिस्थ होतो व जिकडे तिकडे महा अनर्थ होतात. मग योगमायेच्या संगतीने सर्वप्राणिमात्रांच्या शक्ति एके ठिकाणी होऊन महाप्रळय होतो. महाप्रळय काळी, आकाशांत बारा सूर्य उत्पन्न होतात, समुद्रांत वडवानळ झणून जो अग्नि आहे, तोहि त्यावेळी तस होतो, आणि शंकरहि आपला तिसरा डोळा उघडून भयंकर ऊष्णता निर्माण करितो. या तिघांची ऊष्णता एका ठिकाणी झाल्यावर अत्यंत प्रखर असा सर्वत्र अग्नि उत्पन्न होऊन सर्व प्राणिमात्र मरून जातात. सर्व त्रिभुवनांतील पाणी नाहीसे होऊन जाते आणि वनस्पति, वृक्ष वगैरे सर्व कांहीं जळून जाते. तो अग्नि स्वर्गाचाहि नाश करितो पाताळांत जाऊन अमृत शोषून घेऊन नागकुळाचा नाश करून टाकतो, याप्रमाणे सर्व जळाल्यावर ब्रह्मांडांत फक्त रक्षा उडत असते. अशा रीतीनें सर्व चराचराची रक्षा झाल्यावर भयंकर वारा मुटून तो ही रक्षा एका ठिकाणी करितो.