पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ स्तबक 66 यांत तुझा 66 आला. पण पाहतो, तो आपल्या वाणानें श्रीकृष्ण घायाळ झाला असून विव्हळत पडला आहे; तो प्रकार पाहून त्या व्याधाला अत्यंत दुःख झालें, व तो कृष्णाजवळ क्षमा मागूं लागला. तेव्हां श्रीकृष्ण हणाला, "व्याधा, कांहीं अपराध नाहीं, तुझ्या पूर्व जन्मांत तुला मी अशाच रीतीनें मारलें होतें. त्या कर्माचें फळ योग्य असेंच मला मिळालें; मृत्यु लोक ही कर्मभूमि आहे, येथे कर्म भोगल्यावांचून सुटका नाही. आतां मी आपला मुखाने प्राणोत्क्रमण करीन, " श्रीकृष्ण भगवान् असें ह्मणत आहेत तोंच तेथें अर्जुन आला; त्यास पाहिल्यावर कृष्ण ह्मणाले, 'अर्जुना ! बरा वेळेवर आलास ; प्राणोत्क्रमणसमयीं गंगोदक मुखांत पडावें अशी इच्छा आहे." कृष्णाची ही इच्छा पाहून, पार्थानें लागलाच भूमीत बाण मारून गंगा वर आणली, व एका पात्रांत गंगोदक घालून ते पात्र अर्जुनानें श्रीकृष्णाच्या हातांत दिले. त्या वेळीं, श्रीकृष्णाचा स्पर्श झाला, व त्यायोगें अर्जुनाची सर्व शक्ति नाहींशी झाली. तेव्हां त्यास धर्माच्या बोलण्याची आठवण झाली. श्रीकृष्ण परमात्म्यानीं, गंगोदक प्राशन केलें व देह ठेवला. श्रीकृष्णांनी याप्रमाणें देह सोडल्यावर अर्जुन पोराप्रमाणे रडूं लागला, मग आ- पणच आपल्या मनाचें शांतवन करून घेऊन, सर्व गोपींची व यादवांच्या स्त्रियांची समजूत करूं लागला. सर्व औवदैहिक कर्मे त्यानें अनिरुद्धाचा पुत्र वज्रनाभ याचेकडून करविलीं, मग त्यास व स्त्रियांना तो प्रभासाहून मथुरेस घेऊन आला, मथुरेस येत असतांना वाटेंत चोरांनी अर्जुनास लुटले. चोर अर्जुनाकडे आले, तेव्हां त्यानें आपल्या गांडींव धनुष्यास हात घातला, पण तें धनुष्य त्यास त्या वेळी उचललें देखील नाहीं, मग चालविण्याची गोष्ट कोटली ? एवढा मोठा वीर पण शक्ति नाहीशी झाल्यामुळे त्याला त्या वेळी चोरांनी खुशाल लुटले. मथुरेला आल्यावर अर्जुनानें अनिरुद्धाचा मुलगा वज्रनाभ, याला तेथील सिंहासनावर बसवून त्याच्या नांवाने राज्यकारभार चालविला. ८२ कथाकल्पतरु. CC • याप्रमाणे यादवांच्या नाशाची कथा सांगितल्यावर वैशंपायन ऋषि जनमेजयाला म्हणाला; जनमेजया, यादव वीर जरी सर्व नाहींसे झाले आहेत, तरी त्यांचे कांहीं वंशज कोटे कोठे आहेत. मथुरेस अनिरुद्धाचा वंश आहे. सांब, मदन व गद यांचा वंश वज्रपुरी येथे आहे. कन्यावंश हस्तिनापुर येथे आहे. यादवांचा इतिहास पुष्कळच आहे, तो हा तुला मी संक्षेपाने सांगितला आहे.” अध्याय १५ वा. - १ महाप्रळयाची माहिती. यादवांच्या नाशाचा इतिहास ऐकुन घेतल्यावर, जनमेजय वैशंपायन ऋऋषीला हाणाला; " ऋषि ! आपण यादवांच्या नाशाची माहिती सांगितली,