पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १४ वा. ८१ मुख्य व खरीं साधनें आहेत. भक्ति ही अवश्य पाहिजे, भक्तीनेंच ज्ञान आत होतें; भक्ति न करितां एकदम ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करणे हा वेडेपणा होय. कर्म, भक्ति आणि ज्ञान हेंच या लोकींचें अनुष्ठान होय. आत्म्याच्या उन्नतीसाठी भक्ति हें फार सोपें साधन आहे. भक्ति ही नऊ प्रकारची आहे. ईश्वराचें नांव ऐकावयाचें, ही भक्तीची पहिली पायरी होय; दुसरी, ईश्वराचें भजन करणे; तिसरी, त्याचें स्मरण करणे. त्यानंतर पादसेवन, वंदन, अर्चन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन, अशा या भक्तीच्या पायऱ्या आहेत. उद्धबा, तूं ज्ञाता आहेस, तुला सर्व कांहीं समजतें, तेव्हां आझांबरोबर वैकुंठांत येण्यांत मोठा पुरुषार्थ आहे अर्से कांहीं नाहीं. तूं आतां बद्रिकाश्रमी जाऊन आपल्या आयुष्याचा चांगल्या रीतीने विनियोग कर. " कृष्णानें उद्धवास असे सांगि- तल्यावर उद्धव कृष्णाच्या पायांवर मस्तक ठेवून बद्रिकाश्रमी निघून गेला, मग श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेच्या बाहेर आला व त्यानें, मुद्दाम असन्मागनि जाऊन पापाचरण करण्याच्या पाप्यांना द्वारकेंत येऊन उतरण्याची सोय बाहूं नये ह्मणून सर्व द्वारका नगरी समुद्रांत बुडवून टाकली. ४ मुसळाची उत्पत्ति व यादवांचा नाश. द्वारका बुडवून टाकल्यावर श्रीकृष्ण प्रभास येथे आले, त्यांनी तेथें आल्यावर मदन, सांच व गद यांस बोलावून घेऊन सांगितले की " आतां येथे महा अनर्थ होणार आहे तो तुझांस पाहवणार नाही, तरी तुझी आपआपल्या स्त्रियांना घेऊन वज्रपुरीस जा, तेथे तुमची इच्छा असेल तोपर्यंत रहा, तुझीं तिघे चिरंजीव आहांत, तेव्हां तुह्मांस मृत्यूची भीति नाही. तुमची इच्छा असेल त्या वेळी तुह्मांस मात्र शरीराने स्वर्गी जातां येईल." श्रीकृष्णांनी त्यांना याप्रमाणे आज्ञा केल्यावर ते तिघेहि श्रीकृष्णास वंदन करून, आपआपल्या स्त्रियांना घेऊन वज्रपुरीस निघून गेले. पुढें सर्व यादवांनां जलक्रीडा करण्याची इच्छा झाली ते त्यासाठी सागरावर गेले. तेथे मुसळापासून उत्पन्न झालेली पाणकणसें होतीं, ती उपटून, एकमेकांच्या अंगावर फेकूं लागले; पण त्या पाणकणसांच्या आघाताने सर्व यादव मृत झाले, त्या प्रसंगांतून फक्त अनिरुद्धाचा मुलगा "? वज्रनाभ हा मात्र जिवंत राहिला, हा अनर्थ पाहून श्रीकृष्णास फार दुःख झालें. तो एका पिंपळाच्या वृक्षाखाली शोक करीत बसला असतां, दुःखाति- रेकामुळे फार श्रांत झाला व त्याला त्या स्थितीत झोप लागली. याच वेळीं दुरून एक व्याध शिकार टेहाळीत होता, तेव्हां दुरून कृष्णाचा दिसला, त्या व्याधांला दुरून हरिणाचे डोळे चमकत आहेत असे वाटले, व त्याने त्या माशाच्या पोटांत सांपडलेल्या लोखंडाच्या टोंकाचा बाण, पायाचा नेम धरून कृष्णाच्या अंगावर सोडला, बाण बरोबर लागू पडल्यावर तो व्याध शिकारीच्या आशेन श्रीकृष्णाजवळ पाय त्याला