पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कथाकल्पतरू. [ स्तबक वाईटहि अश्र गाळीत आहेत हें पाहून, त्यास फार , आश्चर्य वाटले आणि वाटलें. तो कृष्णाला म्हणाला; " देवा ! आपल्या अंगीं सर्वांच्या दुःखाचें शांतवन करण्याची शक्ति असून, आज आपणच अश्र गाळीत आहां हें काय ? " तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, " उद्धवा, हा सगळा मायेचा खेळ आहे. मृत्युलोकी इतके दिवस मी सहवास केल्यामुळे, मला साहजिक या मर्त्यलोकांविषयीं प्रेम उत्पन्न झालें, आणि म्हणून त्या लोकांस सोडतांना वाईट वाटत आहे. " हें ऐकून उद्धवासहि मायेच्या शक्ति संबंधानें फार आश्चर्य वाटले. व श्रीकृष्णपरमात्मा आतां सर्वांना सोडून जाणार याबद्दल त्यास फार वाईट वाटलें, तो म्हणाला; " देवा" तूं गेल्यावर मागें तुझे भक्त कसे जिवंत राहतील ? फुल- लेल्या वृक्षाच्या आश्रयानें जसे भ्रमर असतात, तसे आम्ही तुझ्या आश्रयानें आहोत. तेव्हां आम्हां भ्रमरांचा वृक्षच नाहींसा झाल्यावर आम्हीं तरी को- णाच्या आश्रयावर या लोकीं राहणार ? आम्हांसहि आपल्या समागमें वैकुंठास घेऊन जा. " हें भाषण ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, 'उद्धवा, याबद्दल खेद करूं नये हें चांगलें.' ही मुत्युलोकची वस्ती आहे, मृत्यु हा या लोकचा धर्मच आहे. ज्यानें या लोकों जन्म घेतला, त्यांस हा लोक केव्हां सोडवा लागेल याचा कांहींहि नियम नाहीं. येथील जीवित हैं अत्यंत क्षणभंगूर आहे वीज चमकते आणि नाहींशी होते, त्याप्रमाणें या लोकची स्थिति आहे. जोपर्यंत या शरीरांत आत्मा असतो, तोपर्यंतच या शरीराची शोभा. आत्म्यानें या शरीरास सोडल्यावर या शरीराची योग्यता मृत्तिकेपेक्षांहि कमी होते. प्राणो- त्क्रमण समयीं ऐकूं येण्याची शक्ति, दिशा हरण करितात. नेत्रांतील दृश्यशक्ति सूर्य हरण करितो. दांताची शक्ति वरुण नाहींशी करितो, जठराग्नी हा जिव्हा शाक्ती नाहींशी करितो. पाणी हे रक्ताला आकर्षण करून घेतें, वायु स्नायूला निःचेष्ट करितो. शरीरांतील तत्व आकाशांत जातें, शरीर मृत्तिकेंत मिस- ळते आणि आत्मा हा मात्र तसाच कायम राहतो. तो पुन्हां दुसरा नवा देह धारण करितो. त्यास मृत्यु नाहीं, तो चिरंजीव आहे, व त्यासच मुक्ति आहे.. मृत्युलोक हा बिकट खराच, पण मुक्तीचें साधन याच लोकीं सुलभ आहे.. या लोकीं भोगावी लागणारी दुःखें व सुखें, हीं ज्याच्या त्याच्या कर्माची फळें होत, या लोकीं ज्ञानदृष्टिही कमी असून मायेचा प्रभाव हा अधिक आहे. या जगांत कित्येक किडे असे आहेत कीं, ते स्वतःच कोश तयार करून त्यांत कोंडून घेतात, आणि जेव्हां ज्ञानदृष्टि प्राप्त होतें, तेव्हां ते त्या कोशांतून उडून जातात. ह्मणजे कोशांतून उडून जाण्याची त्यांनां शक्ति असतें, पंख असतात, पण कोशाच्या बाहेर पडण्याची त्यांनां बुद्धीच होत नाहीं, त्या प्रमाणे प्रत्येक मनुष्य मायेच्या बंधनांत गुरफटून गेलेला असतो. ही बंधनें तोडण्यासाठी ज्ञान हें अवश्य पाहिजे, ज्ञान व उपासना, हीं आत्म्याच्या उन्नतीची या लोकचीं