पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लॅ. ] अध्याय १४ वा. कृष्णास, इंद्र, वरूण, ब्रह्मदेव, शंकर वगैरे भेटावयास आले; आणि कृष्णास नमस्कार करून, त्यांनीं 'आतां अवतार समाप्ति करून वैकुंठीं चलावें , ह्मणून कृष्णाची विनंति केली. तेव्हां कृष्ण भगवंतानीं ' सर्वोची सोडवणुक करून सात दिवसांनीं वैकुंठास येईन.' असें अश्वासन देऊन त्यांना निरोप दिला. मग संकर्षणास बोलावून घेऊन श्रीकृष्ण ह्मणाले; संकर्षणा, आतां हे देह टाकून देऊन आपणास वैकुंठी गमन केले पाहिजे. आपणास नेण्यासाठी देवेंद्र वगैरे आले होते. तर हें वर्तमान व्यांस व पार्थ यांनां कळवून त्यांना माझ्या भेटीसाठी बोलावून आण. या कृप्याज्ञेप्रमाणें संकर्षणाने उद्धवाबरोबर पत्र देऊन, त्यास व्यासाकडे पाठवून दिलें, आणि अक्रुराबरोबर पत्र देऊन त्यास हस्तनापुरास पाठवून दिलें. व्यासानें तें कृष्णाच्या हातचें पत्र पाहून अश्रु गाळण्यास आरंभ केला. अंतकाळचे समयी आपणास कृष्ण बोलावित आहे, पण तें शेवटचें दृश्य आपणास पाहवणार नाहीं, असें व्यासास वाटले. व्यासानें ‘ येत नाहीं’ असे स्पष्ट न कळवितां, अनुष्ठान संपल्यावर येतों ह्मणून कळविलें. इकडे अक्रुराचें पत्र पाहून, धर्मराजाचीहि तीच झाली, त्यांनी पार्थास बोलावून सांगितले की, 'अर्जुना, कृष्णानें निजधामास जाण्याची तयारी केलेली आहे, व शेवटी तुला भेटावें अशी त्यांची इच्छा आहे तर तूं जा, पण पाथी, आतां देवाशीं दुरून दुरूनच बोल, त्याच्या शरीरास स्पर्श केलास तर, तुझी सर्व शक्ति नाहींशी होईल.' अर्जुनास याप्रमाणे सूचना देऊन धर्माने त्यास द्वारकेस पाठवून दिले. मग , ३ द्वारकेस जलसमाधि. इकडे कृष्णानीं, सर्व यादवांनां बोलावून सांगितले की, तुझीं सर्वांनी आतां द्वारका सोडून प्रभास येथे जावें; कारण ही द्वारका नगरी आता लवकरच पाण्यांत बुडून जाईल, हें ऐकून सर्व यादव द्वारका सोडून निवाले; त्यावेळी त्यांनां आपआपली सुंदर घरेंदारें सोडतांनां मनस्वी बाईट वाटलें, पण निरुपाय जाणून बिचारे अश्र ढाळित त्या आपल्या जन्म- भूमीला सोडून, प्रभास येथे आले. यादव द्वारका सोडून गेले तरी श्रीकृष्ण- भगवान् द्वारकेसच राहिले होते. त्या सुंदर नगरीतील ती रमणीय सुवर्णाची मंदिरं रिकामी पडलेली पाहून श्रीकृष्णासहि अत्यंत वाईट वाटू लागले. सोळा सहस्र गोपींची अंतःपुरें शून्य पाहून त्यांना फारच हळहळ वाटली. श्रीकृष्णास सर्व गोष्टी समजत होत्या, ते प्रत्यक्ष ईश्वरच होते, तेव्हां त्यांच्या शक्तांविषयों सांगणें अप्रस्तुत होय. केवळ सहवासामुळे उत्पन्न झालेले प्रेम त्यांनाहि सोड- वेना. स्वर्ग, मृत्यु, पाताळ ही सर्व भुवनें त्यांचीच आहेत, पण त्यावेळी मृत्यु लोकच्या मायेचा परिणाम त्यांच्यावरहि झाला होता. श्रीकृष्ण याप्रमाणें द्वारकेंत चिंताग्रस्त बसले असतांना त्यांचा परमप्रिय भक्त उद्धव तेथें आला. श्रीकृष्ण