पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ [ [स्तवक पुत्र नव्हता; तेव्हां त्यांनीं त्या राज्याचे चार भाग केले, त्यापैकी प्रभावती, गुणवती व चंद्रप्रभा या तिर्धीच्या मुलांनां तीन दिले; व चवथा इंद्राचापुत्र जयंत यानें घेतला. व तो वज्रपुरीच्या राजांचा प्रधान झाला. त्या वज्रनाभाच्या राज्यांत एकसहस्र महापुरें, चारकोटी उपनगरें, व गांवें व खेडीं हीं तर असंख्य होतीं, शिवाय रथ, पालख्या, हत्ती, घोडे वगैरे संपत्ति अगणित होती. त्या सर्वांची सारखी वाटणी करून, चौघांनां दिली, मुख्य सिंहासनावर प्रभावतीचा पुत्र विजय, यांस बसविलें, जयंतास प्रधान केलें, व चंद्रप्रभु व गुणवंत यांनां राज्याची इतर कामें सांगितलीं. विजय यास राज्यावर बसविण्याचे प्रसंगी श्रीकृष्णांनी मोठा उत्सव केला. आणि त्या सर्वांना, 'जोपर्यंत त्रैलोक्य आहे, तो पर्यंत तुमचा यदु वंश चालेल,' असा आशीर्वाद दिला. अशी व्यवस्था केल्यावर श्रीकृष्णानीं, प्रभावती वगैरे तिघा सुनांनां वज्रपुरीस आपल्या पुत्राजवळ राहण्यास सांगितलें, व मदन वगैरे तिघांनां घेऊन तें द्वारकेस जाण्यासाठी निघाले; पण प्रभावतीनें विनंति केली की, ' आमच्या पतींनां आमच्या जवळ आणखी सहा महिनें तरी ठेवावें.' तेव्हां कृष्णानीं मदन, सांब व गद या तिघांनां वज्रपुरीस सहा महिने राहण्यास सांगून, आपण द्वारकेस आले. या वेळीं कृष्णास पुढील अवताराची काळजी लागल्यामुळे, ते कृष्णअवताराच्या समाप्तीच्या तया- रीला लागले. * कथाकल्पतरू. , विनाशकाळ आला ह्मणजे बुद्धिहि तशीच होते. त्या प्रमाणे यादवांकडून या प्रसंगी एक गोष्ट घडून आली. एकदां यादवांनी ऋषींचा खरें खोटे पणा पाहण्यासाठी, सांबास स्त्री वेष दिला व त्याचें पोट मोठें करून त्यास ऋषीकडे नेलें. त्या वेषधारी स्त्रीला ऋषिपुढे उभे करून यादव ऋषीला म्हणाले; "अहो, या स्त्रीला मुलगा होईल, किंवा मुलगी होईल तें सांगावें. " ऋषीनां यादव उन्मत्त होऊन आपली कुचेष्टा करीत आहेत असे आढळून आलें, तेव्हां त्यांनी रागावून यादवांनां शाप दिला की, 'याच्या पोटांतून जें निघेल, त्यानेंच तुम्हां सर्वोचा अंत होईल. हा शाप ऐकून सर्व यादव भयभित झाले व त्यांनीं सांबाचें पोट सोडून पाहिलें तो त्यांतून मुसळ बाहेर पडलें, यादवांनीं त्या मुसळाचें, दगडानें तुकडे तुकडे केले व ते समुद्रांत टांकून दिले. ते बारिक बारिक तुकडे एका माशानें गिळले, आणि कर्मधर्म संयोगानें तोच मासा पुढें लुब्धक नांवांच्या कोळ्याला सांपडला. त्यानें तो मासा घरी आणून चिरला, तो त्याच्या पोटांत मुसळाचे बारिक बारिक तुकडे व मुसळास खालीं बसविलेले लोखंड असे सांप- डलें, कोळ्यानें त्या लोखंडाचें बाणाला पुढच्या बाजूला बसवावयाचे टोंक तयार केलें. व तो लांकडाचा भुगा समुद्र किनारी नेऊन टाकून दिला. त्या लांकडाच्या भुग्याला तेथे अंकुर फुटले व वाढत वाढत तेथे पाणकणसांचें मोठें. थोरलें बन तयार झालें. अवतार समातीचा काळ जेव्हां जवळ आला, तेव्हां