पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १३ वा. श्रीकृष्ण परमात्मा दूर उभे राहून पहात होते, व त्या तिघांनां शंख वाजवून वारंवार प्रोत्साहन देत होते. रणांत आपले हजारो राक्षस पटापट मरत आहेत असे पाहून वज्रनाभानें तमास्त्र सोडून सर्व सैन्यावर अंधार पाडला; पण मदनानें सूर्यास्त्र सोडून तो अंधःकार लागलीच नाहींसा केला. पुढें भगवान् वास- रमणीं अस्ताचली जाण्याची वेळ झाली, तेव्हां उभयतांकडील वीरानी आप- आपलीं शस्त्रास्त्रे खालीं ठेविलीं, त्यांनीं सूर्यास वंदन केलें व ते आपआपल्या छावणीत निघून गेले. , ७७ दुसऱ्या दिवशीं सूर्यबिंब दृष्टीस पडल्यावर पुन्हां युद्धास आरंभ झाला. सुनाभ गदा समोर येऊन मोठ्या त्वेषानें लहूं लागला तेव्हां गदानें त्यावर असा प्रहार केला की त्याबरोबर सुनाभ ठार झाला. सुनाभांची मृत्युवार्ता रणांत पसरतांच दोन्हीं सैन्यानां अधिक स्फुरण आले. वज्रनाभानें संतत होऊन मदनाच्या अंगावर आपला रथ घातला तेव्हां मदनानें असंख्य बाण सोडून वज्रनाभास झांकून त्याचा रथ व घोडे यांचा विध्वंस केला. रथ मोड- ल्यावर वज्रनाभ रथाखाली उतरला व आपली गदा घेऊन मदनाच्या अंगावर धांवून आला. त्यावेळी श्रीकृष्णानी शंख वाजवून मदनास अधिक प्रोत्साहन दिलें, व त्यास गरुडाकडून सुदर्शनचक्र पाठवून असे कळविलें कीं, यास ‘ अंगाविरहित होऊन मार, ह्मणजे हा मरेल. ' ह्या सूचनें प्रमाणे मदनानें हातांत चक्र घेऊन तो अनंग झाला व त्यानें तें चक्र, वज्रनाभाच्या शरीरावर सोडलें. चक्र वज्रनाभाच्या मस्तकावर जाऊन पडल्याबरोबर, क्षणार्धात तो ' उन्मत्त दैत्य रणभूमीवर पडला. हा युद्धचमत्कार आकाशांतून सुरवर पहात होतें. वज्रनाभ पडल्याबरोबर सर्व देवांना मोठा हर्ष झाला, व त्यांनी सर्व यादव वीरांवर आकाशांतून पृष्पवृष्टी केली. मग कृष्ण व देवेंद्र, मदन वगैरे वीरांनां येऊन भेटले व त्यांच्याकडून त्यांनीं वज्रनाभ व सुनाभ यांची और्ध्वदेहिक क्रिया करविली. वज्रनाभ हत झाल्यावर इंद्रानें त्यास स्वर्गात नेलें, व तेथें त्याचें पद्मनाभ असें नांव ठेविलें. श्रीकृष्णानीं आपल्या सुना व त्यांचे पुत्र यांनां परमप्रीतींनी कुरवाळिलें व त्यांनां आशीर्वाद दिला. अध्याय १४ वा. १ यादवांचा नाश. वैशंपायन ऋषी जनमेजयराजाला पुढील कथा सागू लागले, ते ह्मणाले; "हे जनमेजया, वज्रनाभाचा नाश झाल्यावर श्रीकृष्णादि सर्व यादव, व इंद्रादि सर्व सुरवर, वज्रपुरीस आले. वज्रनाभाचें राज्य फार मोठे होते व त्यास ●