पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ कथाकल्पतरू. [ स्तबक बरोबर घेऊन; तो स्वतः युद्धासाठी रणक्षेत्रावर आला. त्याच्याप्रमाणेंच महापरा- क्रमी असा त्याचा बंधु सुनाभ, हाहि त्याच्याबरोबर आला होता. तो रणक्षेत्रावर आल्याबरोबर आपली गदा महा वेगानें फिरवित फिरवित, गदाच्या अंगावर धांवून आला, तेव्हां गदहि आपली गदा घेऊन त्याच्या अंगावर धांवून गेला. त्या वेळी ते दोघे, दोन पर्वत मोठ्या वेगानें एकमेकाकडे धांवत यावेत त्या- प्रमाणे दिसले. सुनाभानें आपली गदा गदाच्या मस्तकावर हाणून त्यास जमिनीवर लोळविण्याच्या बेतांत आणले होते; परंतु इतक्यांत गदार्ने चपळाई करून, सुनाभाचा नेम चुकविला, व आपली गदा त्याच्या मस्तकावर घातली; तरी तो आघात सहन करून, सुनाभ गदाबरोबर युद्ध करीत होता; पण तो कमजोर झाला आहे असे पाहून त्याच्या साह्याला कुंभक धांवला. तेव्हां त्यास सांब अडवून ह्मणाला; “ अरे, तूं खरा क्षत्रिय नाहींस, असे वाटते. त्या दोघांचें युद्ध चाललें असतां तूं मध्ये कशाला जातोस ? एका वीराच्या अंगावर दोन वीर कधींहि धांवून जात नाहींत. तुला युद्ध करावयाचें असेल तर माझ्याशी कर." असें सांब म्हणाल्यावर कुंभक सांबाबरोबर युद्ध करूं लागला. कुंभकाने आपला रथ मोठ्या वेगाने सांबाच्या अंगावर घातला, पण साँबानें एका गदेच्या तडाख्यानें रथाचें चूर्ण करून कुंभकास रथाचें खालीं ओढले. व त्याच्या मस्तकावर गदेचा प्रहार करून त्याला रणभूमीवर निजविले. कुंभकासारखा बलाढ्य वीर नाहींसा झाल्यावर वज्रनाभाच्या सैन्यांत एकच हाहा:कार उडाला, व तें सर्व दैत्यसैन्य मागें हटू लागलें, तेव्हां वज्रनाभानें त्या सर्वांना पुन्हा प्रोत्साहन देऊन रणक्षेत्रावर आणले व पुन्हां जोराची लढाई सुरू केली, वज्रनाभानें आपला रथ नीट सांबाच्याच अंगावर घातला, तेव्हां मदन पुढे झाला व त्याने सांबास आपल्या मागें घातलें. याप्रमाणें युद्ध सुरू झाल्यावर, इंद्र आपला पुत्र जयंत, यासह तो युद्धप्रसंग पाहण्यासाठी तेथें आला, त्याने आकाशमार्गाने पाहिले तो तिघेहि आपल्या पराक्रमानें सर्वोनां दिपवून टाकित आहेत; पण तिघाजवळहि रथ नाहींत, सारथी नाहींत, वाहनें नाहींत, आणि शस्त्रास्त्रांची सामग्रीही पुरेशी नाहीं, अशा स्थितीत त्या यादव वीरांस पाहून इंद्रानें आपला रथ व मातली नांवाचा सारथी गदास दिला, व सांबास आपला ऐरावत दिला. यादव वीरांनां इंद्राकडून ही सामग्री मिळाल्यावर युद्ध अधिक जोरानें चालू झाले. मदन, सांब व गद या तिघांनी, वज्रनाभाच्या सैन्यांतील हजारों लोक यमसदनीं पाठविलें. रूधिर मांसानें सगळी रणभूमि कुरूंबी रंगानें रंगविल्याप्रमाणे दिसूं लागली. रक्ताचे पाट वाहू लागले. द्वारकेंत ही हकीकत कळतांच श्रीकृष्णहि आपणाबरोबर अनंतवीर घेऊन तेथे आले. याप्रमाणे यादववीर मदन सांत्र गद, यांच्या साह्यास आल्यावर युद्धास अधिकच रंग चढला. हा युद्ध प्रसंग