पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १३ वा. ८८ प्रभावती, ऐकून ते सहाहि वीर खदखदां हांसले. मदन प्रभावतीला ह्मणाला; तुझी कोणीहि यासंबंधानें मुळीं देखील काळजी करूं नका.. आह्मी सर्व केवळ वज्रनाभाचा संहार करण्यासाठींच येथें आलेलो आहोत, त्यानें लाखों सैन्य आणलें तरी, त्याच्याबरोबर युद्ध करण्यास आह्नीं पुरे आहोत. पण आह्मांला वाईट वाटतें तें एवढेच कीं, आज तुझ्या बापाला मला या जगांतून नाहींसें करावे लागणार. हा प्रसंग टाळण्यासाठी तुझांला येथून पळवून घेऊन जाण्या- चीहि आमच्या आंगीं शक्ति आहे, पण तसे करणे हा वीरांचा धर्म नव्हे. ह्मणून आह्मी आतां तुझ्या पित्याबरोबर युद्ध करून त्याला यमसदनाची वाट दाखविणार. तुझा बाप तुला आज अंतरणार याबद्दल मला खरोखर फार वाईट वाटतें; पण त्याला माझा नाइलाज आहे. दुष्टांचा संहार करणें हैं आमचें ब्रीद आहे. तुझ्या बापाच्या संहाराची आह्मी तयारी करीत आहों याबद्दल तुला वाईट वाटत नाहींना ?" ७७ प्रभावती म्हणाली; नाथ ! स्त्रियांचें मुख्य भूषण पति हैं होय. स्त्रियांचें सर्वस्व कायतें पति, पतिपेक्षां स्त्रिया कोणावरहि अधिक प्रीति करीत नाहीत. आई, बाप, बंधु या सर्वांपेक्षां पति व पुत्र स्त्रियांना अधिक प्रिय असतो, हीच आम्ही आमची मुख्य व खरी संपत्ति समजतों, तेव्हां आपण सहाजण सुरक्षित राहण्यासाठीं, व राज्यांतील प्रजाजनांचें दुःख नाहींसें करण्यासाठी, आपण माझ्या पित्याचा खुशाल वध करावा, त्याच्यावर माझी प्रीति आहे हे खरें ! त्याच्या मृत्यूनें मला दुःख होईल; आणि मी त्याच्यासाठी अश्र गाळीन हेंही खरें !! पण मी. आपणास आपल्या ब्रीदाच्या आड कधींहि येणार नाहीं, आपण आपले कर्तव्य करीत असतांना, मी आपला हात न धरितां आपणास साह्यच करीन !!!” हें प्रभावतीचें बोलणे ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला व सर्व- जण आपआपली शस्त्रास्त्रे घेऊन युद्धास तयार झाले. तिघे पुत्र आपल्या आईचें संरक्षण करण्यासाठी महालाजवळ राहिले, आणि मदन, गद व सांत्र, हे महालास वेढा घालणाऱ्या सैन्यावर तुटून पडले. गदानें आपल्या तलवा- रीच्या विलक्षण चापल्यानें पहिल्याच उसळीला, वज्रनाभाचे हजारों वीर नाहींसे केलें, सांबानें सर्व सैन्य रेटीतरेटीत, महालापासून लांब नेलें. हा त्या दोघांचा विलक्षण पराक्रम बघून वज्रनाभाचे सैनिक तोंडांत बोटे घालू लागले, 'अरें, हे वीर लहान दिसतात, पण यांचा पराक्रम मोठा आहे.' अशी ते त्यांची प्रशंसा करूं लागले. त्यांचा पराक्रम पाहून वज्रनाभाच्या सैन्यासहि अधिक स्फुरण चढलें; व ते जोरानें त्या तिघांवर हल्ले करूं लागले; परंतु यादवांच्या तरवा- रींनीं क्षणार्धीत बहुतेक सैन्य नाहींसें होऊन, बाकीचें मागें परतून वज्रनाभाकडे गेलें; व त्यास मदनानें उडविलेला हाहा:कार सांगू लागले. तो युद्ध- वृत्तांत ऐकून, वज्रनाभ अधिक संतापला, व त्यानें आपला सर्व सैन्यभार १