पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ कथाकल्पतरू. [ स्तबक अध्याय १३ वा. वज्रनाभ राजाचा संहार. वैशंपायन ऋषि जनमेजयाला म्हणाले; "हे राजा जनमेजया, प्रभावतीच्या महालांत मदन वगैरे जरी मोठ्या आनंदांत होते तरी, वज्रनाभ दैत्याचा कसा संहार करावयाचा, ही त्यांनां मोठीच काळजी होती. प्रभावतीचें मन न दुखवितां तिच्या बापाला मारावें कसें, अशा विचारांत मदन, गद व सांब असतांना, एके दिवशीं वज्रनाभाचे हजारों सैनिक प्रभावतीच महालावर धांवून आले, व त्यांनी महालास वेढा घातला. प्रभावतीने अत्यंत गुप्तपणे विवाह केला होता, व आपल्या महालांतील प्रकार कोणास कळू नये ह्मणून, फार खबरदारी घेतली होती, व त्याप्रमाणे तिला यशहि आलें होतें. पण घरभेदे हे सर्वत्र असतातच. एके दिवशीं कांहीं कारणावरून, एक परिचारिका प्रभावातीवर रुष्ट झाली व तिनें झालेली सर्व हकीकत वज्रनाभ दैत्यास जाऊन सांगितली. ती हकीकत ऐकून, वज्रनाभास पराकाष्ठेचें दुःख झाले व तितकाच संतापहि आला. त्या दुःख व संतापातिरेकानें राजास काय करावें तें कळेना, युद्ध करावें तर मदन वगैरे मृत्युमुखी पडून मुलींना वैधव्य प्राप्त होणार, आणि त्यांनां वैधव्य प्राप्त झाले ह्मणजे त्या सहगमन केल्यावांचून राहणार नाहीत. बरें युद्ध करूं नये तर, स्वतःचा प्राण जाणार, याप्रमाणें राजा विचार करीत असतां, त्यास नक्की कायतें ठरवितां येईना. शेवटी त्याच्या मनावर स्वतःच्या महत्वाकांक्षेचा अंमल बसला व तो मदनाबरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाला. मुलींनां वैधव्य येऊन त्यांनी सहगमन केले तरी कांहीं हरकत नाहीं. पण स्वतःची महत्वाकांक्षा सोडावयाची नाहीं. अतें राजानें ठरविलें. राजाचा हा विचार कायम झाल्यावर त्यानें आपले हजारों सैनिक प्रभावतीच्या महालांत असलेल्या सहा वीरांनां पकडून आणण्ण्यासाठी पाठवून दिले. २ मदन व प्रभावती. इकडे प्रभावतीच्या महालाला वज्रनाभाच्या सैन्यानें वेढा घातल्यावर प्रभा- वती, चंद्रप्रभा व गुणवती या तिघींची अवस्था मोठी चमत्कारिक झाली; त्या आपआपल्या पतीच्या गळ्याला मिठ्या मारून रडूं लागल्या, प्रभावती मदनाला ह्मणाली; अहो, मी तुमची स्त्री नसून तुझाला वैरीण मात्र झालें, दारापुढे आलेल्या या सैन्यभारापुढे तुमचा कसा टिकाव लागणार ! माझा वाप वज्रनाभ अत्यंत निर्दय आहे. तो तुम्हां सर्वांची कत्तल केल्यावांचून राहणार नाहीं, तेव्हां अगोदर आपल्या हातांनी आम्हां तिघींनां या जगांतून नाहींसे करा, आणि मग तुझांला काय करावयाचे असेल तें करा !!!" प्रभावतीचें हें भाषण