पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १२ वा. ७३ पार्वती महादेवाला म्हणाली; ' हें काम्यकवन आपण क्रीडेसाठी मुद्दाम ठेविलेलें असून, येथें देखील लोक येऊन त्रास देतात, हें वरें नव्हे. ' पार्वतीचें हें वोलणें ऐकून महादेवांनीं ' या वनांत जो पुरुष येईल, तो तत्काळ स्त्री होईल.' असा त्या वनास शाप दिला तेव्हांपासून त्या वनांत जो पुरुष जातो, तो स्त्री होतो. त्या प्रमाणे सुद्युम्नहि स्त्री झाला. पुढे त्या स्त्रीची व बुधाची गांठ होऊन त्या दोघांनी विवाह केला, आणि त्या स्थितीत असतांनां मुद्युम्नास पुत्र झाला, त्याचें नांव पुरू रवा असें ठेविलें. हा प्रकार श्राद्धदेवास कळल्यावर त्यांसफार वाईट वाटलें, मग तो व वशिष्ट, असे शंकराकडे गेले, व सुयुम्नास पुरुष करा ह्मणून त्यांनीं शंकराची. प्रार्थना केली. तेव्हां शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले; ' माझा वनशाप हा कधीहि टळावयाचा नाहीं; तथापि तुमच्या प्रार्थनेनें मी प्रसन्न झाला असल्यामुळे, मी सुद्युम्नास असा उ:शाप देतों कीं, तो महिनाभर पुरूष व एक महिनाभर स्त्री, असा राहील.' त्या सुयुम्नाच्या स्त्रीला सुद्युम्नापासून उत्कल, गय, व विमल अशी तीन मुले झालीं, आणि तो स्वतः स्त्री असतांना त्यास पुरूरवा मुलगा सुद्युम्नास आपल्या त्या स्थितीचा फारच कंटाळा आला व त्याने आपले राज्य पुरूरव्यास देऊन तो वानप्रस्थाश्रमी झाला. त्यानें मोठें कडकडीत तप केले तेव्हां त्यास मुक्ति मिळाली. " , झाला. ही कथा सांगून होत आहे तोंच द्वारकेहून श्रीकृष्णाकडून प्रभावतीच्या महा- लांत हंस आला. त्याने सर्वांना द्वारकेकडील कुशल कळविलें व म्हणाला; “मदना तूं आतां असा स्वस्थ बसून दिवस गमावूं नकोस. तिकडे कश्यप ऋपिचा यज्ञ आटोपत आला आहे, तेव्हां तो संपला नांहीं तोंच तुम्हीं, वज्र- नाभास मारून टाकिले पाहिजे. नाहींतर मग पुढें वज्रनाभाचा नाश करावयाला फार जड जाईल." हे ऐकून मदन म्हणाला; “ हंसा तूं म्हणतोस तें खरें, ● पण आम्हां सर्वोच्या स्त्रिया गरोदरावस्थेत आहेत, तेव्हां त्या संबंधानें कसें करा- वयाचें ? तें तूं पुन्हां द्वारकेस जाऊन श्रीकृष्णास कळीव व ते काय सांगतील तें आम्हांला येऊन सांग. " मग हंस द्वारकेस गेला व पुन्हां श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला, हंस म्हणाला; मदना, त्या संबंधानें आपण मुळींच काळजी करूं नये, असें श्रीकृष्णानीं सांगितले आहे, तुम्हां तिघांनांहि पुत्र होतील व ते एक महिन्याचे झाल्यावर त्यांनां सर्व युद्धविद्या प्राप्त होऊन, तुम्हांस ते युद्धाचे प्रसंगी साह्य करितील." पुढें कांही दिवसांनी तिघांच्याहि स्त्रिया प्रसूत झाल्या, व तिघीनांहि पुत्र झाले. त्यावेळी सर्वोसच मोठा आनंद झाला, प्रभावतीनें कोणास कळू न देतां पुत्र प्राप्तीबद्दल मोठा उत्सव केला. मदनाच्या पुत्राचें नांव विजय, सांबाच्या पुत्राचें नांव गुणवंत व गदाच्या पुत्राचें नांव चंद्रप्रभु असें ठेविलें. पुढे एक महिना लोटल्यावर ते तिघेहि सर्व शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण होऊन, मोठाल्या वीराप्रमाणे दिसूं लागले. 66