पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ [ स्तबक तांनां त्यांच्या घरी जाऊन त्यांची स्त्री बलात्कारानें हरण करून आपल्या घरीं आणिली. गुरूला हें वर्तमान कळल्यावर, तो इंद्रादि देवांकडे गेला व त्यानें झालेली सर्व हकीगत सांगून आपली स्त्री देवेंद्रास परत आणून देण्याविषयीं विनंति केली. त्याप्रमाणे देवेंद्रानें चंद्राजवळ गुरूची स्त्री जी तारा, तिची मागणी केली, पण तो देईना. तेव्हां देवांनी चंद्राबरोबर युद्ध सुरू केलें, त्या वेळीं चंद्रानें भयंकर थंडीचा वर्षाव करून, इंद्रादि देवांना थंड गार करून टाकलें. तें वर्तमान महादेवांना कळल्यावर महादेव आपला त्रिशुळ घेऊन व श्रीकृष्ण आपलें सुदर्शनचक्र घेऊन चंद्राचा नाश करण्यासाठी आले, हा प्रकार पाहून ब्रह्मदेवास वाटलें कीं, आतां हे दोघेहि चंद्राचा नाश करितील. मग ब्रह्मदेव त्या दोघांनां विनयपूर्वक म्हणाला; अहो, चंद्राचा नाश करूं नका, कारण तो सर्व वनस्पतीला रस देणारा असून त्याच्यावर सर्वांचे जीवन अवलंबून आहे. दिनमान त्याच्यामुळे समजतें, आयुष्याची गणना केवळ त्याच्यामुळे करितां येते; तेव्हां त्याचा नाश करूं नका. त्याचा नाश केल्यास सर्वत्र अनर्थ होईल. मी त्याच्याकडे जाऊन गुरुपत्नीला घेऊन येतो." मग ब्रह्मदेव चंद्राकडे गेले व ते गुरुपत्नीला घेऊन आले. चंद्राकडे असतांना तारा गरोदर झाली, व तिला पुढे मुलगा झाला, तोच बुध हा होय. चंद्र- वीर्यापासून तारा जरी गरोदर झाली होती, तरी तिला महापतीव्रता समजतात, व तिचें नांव प्रसिद्ध पंचकन्यांत आहे. बुधानें 'इला' नांवाच्या सूर्यवंशांतील मुलीशी लग्न केले होतें. ही इला कांहीं दिवस पुरुष व कांहीं दिवस स्त्री अशी असे. इला ही श्राद्धदेवाची मुलगी होय. श्राद्ध- देवास पुष्कळ दिवस संतति होत नसल्यामुळे त्याने तिच्या प्राप्तस्तिव यज्ञ केला. त्या वेळीं ऋपीनी त्यास 'तुला मुलगी होईल' हाणून आशीर्वाद दिला. मग यथाकालीं त्या श्राद्धदेवाची स्त्री प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. पण मुलीकडून कुलाचा उद्धार व वंशाची वृद्धि होणार नसल्यामुळे, श्राद्धदेव त्या मुलीला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला, व त्याची त्यानें अनन्य भावानें सेवा केली, तेव्हां ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यास म्हणालें; ' हे श्राद्ध देवा, मी तुझ्या भक्तीनें प्रसन्न झालों आहे. या मुलीचाच मुलगा होऊन तो तुझ्या कुळाची वृद्धि करील. ' ब्रह्मदेवाने असे म्हटल्याबरोबर त्या मुलीचा सुंदर मुलगा झाला. 'मग श्राद्धदेवानें त्या मुलाचें नांव सुद्युम्न असें ठेविलें. पुढे तो मुलगा शंकराच्या काम्यक वनांत शिकारीसाठी गेला असतांनां एकाएकी पुरु- पाचा स्त्री ह्याला. याचें कारण असें होतें कीं, पूर्वी काम्यक वनांत महादेव, पार्वतीबरोबर क्रीडा करीत असतांनां महादेवाच्या दर्शनासाठीं कांहीं ऋषि आले. त्यावेळी पार्वती नग्नावस्थेत असल्यामुळे फार लाजली व घाईघाईन तिनें वस्त्र परिधान केलें. नंतर ते ऋषि महादेवाचें दर्शन घेऊन गेल्यावर, कथाकल्पतरू .