पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ लें. ] अध्याय १२ वा. हरण केलें व तिला तो द्वारकेस घेऊन जाऊं लागला. हा प्रकार पाहून, दुर्योधनास अनिवार कोप आला; व तो ससैन्य सांबाच्या मार्गे लागला; तेव्हां सांबहि मागें परतून, त्या सर्वांशी एकटा युद्ध करूं लागला. पण कौरव हजारों असल्यामुळे, एकट्या सांबाचें कांहीं चालेना. तो हतवीर्य, झाला तेव्हां दुर्योधनानें लक्ष्मणेसह सांबास धरून आणून त्या दोघांना हस्तनापुरच्या तुरुंगांत ठेविलें. हें वर्तमान कृष्णास समजल्यार कृष्णानें सांबाच्या सोडवणुकीसाठीं बलरामाला हस्तनापुरास पाटवून दिले. बलरामानें दुर्योधनास बोलावून आणून, प्रथमतः नीट सामोपचाराने सांगून पाहिलें; परंतु त्यास अभिमान वाटत असल्यामुळे, त्यानें बलरामाच्या म्हणण्या- कडे दुर्लक्ष करून उलट त्याचा अपमान केला. तेव्हां बलरामानें आपला नांगर भूमींत रोविला व तो हलवूं लागला. त्या प्रसंगी हस्तनापुरांतील हजारों मंदिरें डळमळू लागली. कित्येक घरें पडलीं, आणि साऱ्या नगरांत मोठा अनर्थ उडाला. या अनर्थाचें मूळ दुर्योधनास समजतांच तो बलरामाजवळ आला आणि त्यानें त्याची क्षमा मागितली व बलरामाची समजूत घालून त्यास वाड्यांत नेलें. मग मोठ्या समारंभानें सांबाबरोबर लक्ष्मणेचा विवाह करून बलरामासह त्यांनां द्वारकेस पोहोंचतें केलें. ” मदनानें सांगितलेली ही कथा ऐकून, गुणवती व चंद्रावती यांनां आपण सांब व गद, यांच्याबरोबर केव्हां विवाह करूं असे झालें. मग मदनानें हंसि- णीला सांगून गद व सांब यांस गुप्तरूपानें प्रभावतीचे महालांत बोलावून घेतलें, व आपला हेतु सांगून, गांधर्व पद्धतीने चंद्रावतीचा दाबरोबर व गुणवतीचा सांबाबरोबर विवाह लाविला. त्या दोघींना प्रभावतीने आपल्याच महालांत ठेवून घेतलें. कित्येक दिवसपर्यंत त्या तिघींनी दाम्पत्यमुखाचा अनुभव घेतल्या- वर त्यांच्या शरीरावर गरोदरावस्थेची चिन्हें दिसूं लागली. त्या सर्वांचें ते दिवस अर्थातच मोठ्या सुखानें चालले होते. खावें, प्यावें, सारीपाट खेळत बसावें आणि मौजेनें गप्पा मारीत रहावें, हाच त्यांचा व्यवसाय झाला होता. मदन त्या सर्वांना अनेक देवादिकांच्या कथा सांगत असे. एके दिवशीं सारी- पाट खेळत असतांना; चंद्र, मेघमंडळाच्या आड झाला. त्यामुळे गच्चीवर काळोख पडला. तेव्हां मदन म्हणाला; ‘ येथें तीन शशीवदना आहेत; पण प्रकाश एकीचाहि नाहीं; त्यावरून चंद्राच्या गोष्टी निघाल्या, मदनाने प्रभा- वतीस चंद्र, चंद्राचा बुध व बुधाचा मुलगा पुरूरवा याविषयीं थोडी माहिती सांगितल्यावर सर्वोसच पुरुरव्याची कथा ऐंकण्याची इच्छा झाली, व मदनानें पुरुरव्याची कथा सांगण्यास आरंभ केला. मदन " चंद्र हा अत्रि ऋषीचा वीर्यगोल होय. तो पूर्वी सोळाहि कलांनी परिपूर्ण असा होता; परंतु त्यानें - एके दिवशीं बृहस्पति स्नानाला गेले अस 3 मुलगा म्हणाला;